शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ब्रांच मॅनेजरला ट्रेडिंगचे आमिष दाखवून ७ लाखांचा गंडा

By भाग्यश्री गिलडा | Updated: February 23, 2024 14:05 IST

गुंतवणूक केल्यास प्रचंड पैसे मिळतील, असे भासवून तक्रारदार यांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले

पुणे: ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून ब्राँच मॅनेजरची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी गुरुवारी (दि. २२) भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजेंद्र अशोक अग्रहारी (वय - ३३, रा. कोंढवा रोड) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १६ जून २०२३ ते १६ सप्टेंबर २०२३ दरम्यान घडला आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे तक्रारदार यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. विधी सोनी बोलत असल्याचे सांगून ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर नफा मिळेल, असे सांगितले. तक्रारदार यांनी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास होकार दिल्याने त्यांना एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड केले. गुंतवणूक केल्यास प्रचंड पैसे मिळतील, असे भासवून तक्रारदार यांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्यानंतर बनावट वेबसाईटच्या आधारे खोटा नफा मिळत असल्याचे भासवून तक्रारदार यांना एकूण ७ लाख २० हजार रुपये भरण्यास प्रवृत्त केले; मात्र प्रत्यक्षात ते पैसे विड्रॉल केले असता त्यामध्ये अडचणी येत होत्या, त्यामुळे तक्रारदार यांनी विचारणा केली असता पैसे काढण्यासाठी आणखी पैसे भरावे लागतील, असा तगादा लावण्यात आला. आपली फसवणूक झाली असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मंगल मोंढवे करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकMONEYपैसाfraudधोकेबाजी