शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

पुणे जिल्ह्यातील ४४ दरडप्रवण गावांसाठी ६८ कोटींचा आराखडा

By नितीन चौधरी | Updated: December 21, 2023 14:14 IST

उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची राज्य सरकारकडे मागणी

पुणे: भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील ७२ गावे दरडप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. त्यातील ४४ गावांच्या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृती आराखड तयार केला असून तो राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. हा आराखडा ६८ कोटी १७ लाख रुपयांचा आहे.

केंद्रीय सरकारी यंत्रणांनी सर्वेक्षण केल्यानंतर पुणे जिल्ह्यातील सुमारे ७२ गावे ही धोकादायक अर्थात दरडप्रवण क्षेत्रे असल्याचे जाहीर केले आहे. राज्य व केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या विविध आपत्तीचे सौम्यीकरण करण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाद्वारे निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या दृष्टीने पुणे जिल्ह्यात उद्भवणाऱ्या आपत्तीमुळे जीवित तसेच वित्त हानी टाळण्यासाठी उपायोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी या ७१ गावांचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. विभागाने हा आराखडजा तयार करण्याासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाची मदत घेतली होती. त्यात त्यापैकी सुमारे ४४ गावांमध्ये उपाययोजना करण्याचे सुचविण्यात आले आहे. आता हा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राज्य सरकारकडे पाठविला असून येथील उपाययोजनांसाठी ६८ कोटी १७ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली.

धोकादायक गावे

भोर – डेहेन, नानावळे, सोनारवाडी, कोर्ले जांभुळवाडी.मुळशी – कळमशेत, विठ्ठलवाडी, ओझकरवाडी, हिवाळे वस्ती, गडले (दूधवान वस्ती), कोळावडे, साईव.वेल्हे - माणगाव, घोळ गाराजाईवाडी/गर्जेवाडी, रुळे धनगरवाडी, कादवे, वडघर शिर्कोली टेकेपोळे रस्ता, आंबवणे , सिंगापूर, हरपूड, वडघर, घोल, घिवशी.जुन्नर – हातवीज, भिवाडे खु, घंगाळदरे, भिवाडे बु.मावळ – कळकराई , माऊ (मोरमारवाडी), वाऊंड, वडेश्वर, फलाने, मालेवाडी,वेहेरगाव, कुसवली.आंबेगाव – कोलतावडे, तळपेवाडी, सावरली, आमडे, आसाणे, बोरघर, बोरघर (दरेवाडी), पांचाळे खुर्द, दिगद, अडीवरे.

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्रSocialसामाजिकMONEYपैसा