शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आंबा महोत्सवातील ६३ स्टॉल जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 18:54 IST

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  

ठळक मुद्दे दोन ते तीन हजार हजार पेट्या आंब्याचा कोळसा गेल्या तीन आठवड्यांपासून पणन मंडळ कार्यालयाच्या आवारात महोत्सव सुरू

पुणे : गुलटेकडी येथील मार्केट यार्ड परिसरात शेतकरी ते ग्राहक आंबा महोत्सवाच्या स्टॉलला शुक्रवारी सकाळी  साडे अकराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत महोत्सवातील तब्बल ६३ स्टॉल जळून खाक झाले. यामध्ये शेतक-यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. तब्बल दोन ते तीन हजार पेट्या आंब्यांचा पूर्णपणे कोळसा झाला. अग्निशमन दलाने घटनास्थळी तत्काळ दाखल होत आग आटोक्यात आणली.  महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  गेल्या तीन आठवड्यांपासून पणन मंडळ कार्यालयाच्या आवारात हा महोत्सव सुरू होता. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील जवळपास ७३ ते ७५ शेतकरी सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांत आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने एका स्टॉलमध्ये प्रत्येक शेतक-यांच्या सुमारे २५ ते ३० पेट्या ठेवल्या असल्याचे सांगण्यात आले. आंब्याची विक्री झाल्यानंतर आंब्याच्या रिकाम्या पेट्या तसेच गवत मोठ्या प्रमाणात आवारातच पडून होते. त्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. यामध्ये, सर्व स्टॉल जळून खाक झाले.      पणन मंडळाच्या वतीने महोत्सवाच्या ठिकाणी आगप्रतिबंधक सर्व योजना करण्यात आल्या होत्या. मात्र, लाकडी पेट्या, गवत तसेच मंडपाच्या कापडामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली. आग लागल्यानंतर शेतक-यांनी काही प्रमाणात आंबा बाहेर हलविला. मोठ्या प्रमाणात आंबा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. यावेळी, शेतक-यांच्या जेवणाची व्यवस्था पणन मंडळ कार्यालयात करण्यात आले असल्याची माहिती जे. जे. जाधव यांनी दिली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहे. 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डMangoआंबाFarmerशेतकरीfireआग