शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

सौर ऊर्जेच्या माध्यमातून ६२ हजार युनिट वीजनिर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 15:15 IST

अपारंपारिक ऊर्जा स्रोतांमधील ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करण्याची संकल्पना बावधन येथील एका सोसायटीने प्रत्यक्षात उतरवली आहे.

ठळक मुद्देअँबियन्स अँटिलीया सोसायटीचा प्रकल्प 

पुणे : स्मार्ट सिटी या योजनेला साजेशी अशी अपारंपारिक ऊर्जा स्रोतांमधील ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करण्याची संकल्पना बावधन येथील अँबियन्स अँटिलीया या सोसायटीने प्रत्यक्षात उतरवली आहे. या सोसायटीतील सभासदांच्या सहकायार्ने आर्थिक बाजूवर मात करत महिन्याला ५ हजार १०० युनिट वीज निर्मिती करणारा ४१.३ किलोवॅट क्षमतेचा आधुनिक सौर ऊर्जा प्रकल्प इमारतीवर बसविण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उदघाटन  नुकतेचउपनिबंधक सहकारी संस्था चे दिग्विजय राठोड यांच्या हस्ते झाले.  नगरसेवक दिलीप वेडे, नगरसेविका अल्पना वरपे, चेअरमन संजय चौधरी, सेक्रेटरी गिरीश काळे, कमिटी सदस्य दीपक हर्डीकर आणि सोसायटी सभासद यावेळी उपस्थित होते.

या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ही महावितरण कंपनीला देण्यात येणार आहे. महावितरण कडून सोसायटीची लागणारी वीज दिलेल्या विजेच्या युनिट मधून वजा करून उर्वरित बिल सोसायटी भरणार आहे. या माध्यमातून सोसायटीच्या वीजबिलात वषार्ला सुमारे १० लाख रुपयांची बचत होणार आहे. या प्रकल्पामध्ये व्दिनपीक या आधुनिक कॅनडियन सोलर पॅनलचा वापर केला आहे. त्याची क्षमता साधारण १८ टक्के एवढी आहे. या तंत्रज्ञानामुळे जरी सोलर वरती धूळ किंवासावली पडली तरी संपूर्ण प्लेट बंद न पडत उर्वरित प्लेट ऊर्जा निर्मिती करत राहते. तसेच भारतीय हवामानाची क्षमता (इफिशिअन्सी) लक्षात घेऊन म्हणजेच कितीही जोराचे वारे किंवा वादळ आले तरी ऊर्जा निर्मिती सुरूच राहील. या सोलर पॅनल ला इंटरनेटशी जोडल्याने दिवसभरात किती वीज निर्माण,  झाली किंवा आत्तापर्यंत किती निर्माण झाली हे पाहणे शक्य होणार आहे. असे दिपक हर्डीकर यांनी सांगितले या वेळी राठोड यांनी हा प्रकल्प राबविल्या बद्दल सर्व पदाधिकारी व सभासदाचे कौतुक केले. आणि इतर स?सायट्यानी या प्रकल्पाचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले.  हर्डीकर म्हणले कि अशा प्रकारची अत्याधुनिक यंत्रणा वापरून उभारण्यात आलेला हा पुण्यातील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पास एकूण २२ लाख रुपये एवढा खर्च आला असून सर्व सभासदांनी एकत्र येत ४ महिन्यात हा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाचा ५ वषार्चा देखभाल खर्च देखील खरेदी किमतीत असल्याने सोसायटीला त्याचा कुठलाही अतिरिक्त भार पडणार नाही.  

चौकट- हा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानउक्त असून याच्या माध्यमातून  वर्षभरात जवळपास ५१ टन कार्बन उत्सर्जन होण्यापासून वाचणार आहे. जर आंब्याचा झाडाचा विचार केला तर सुमारे ५ हजार शंभर झाडांमुळे एवढे कार्बन उत्सर्जन रोखू शकते ते या एका प्रकल्पाच्या माध्यमातून रोखणे शक्य होणार आहे  झाला ..........................गटाचा संबंध नाही.

टॅग्स :Puneपुणेmahavitaranमहावितरण