शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

हरिश्चंद्रगडावर ६ तरुण भरकटले; एकाचा थंडीने गारठून दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 13:34 IST

पर्यटकांनी गाईडला घेऊनच पर्यटनस्थळाचा प्रवास करावा, पोलिसांची सूचना

उदापूर : हरिश्चंद्रगडावरपर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्याहून सहा तरुण हरिश्चंद्र गडावरपर्यटनासाठी आले होते. एक तारखेला सायंकाळी तीन वाजल्याच्या दरम्यान त्यांनी तोलारखिंडीतून गडावर चढण्यास सुरुवात केली होती. मात्र दाट धुक्यामुळे रस्ता भरकटल्याने दोन दिवस हरिश्चंद्रगडाच्या जंगलातील डोंगराच्या कपारीत त्यांनी आश्रय घेतला होता, अशी माहिती मिळाली आहे. 

हरिश्चंद्रगड परिसरात असणारी थंडी आणि पावसाने एका पर्यटकाची प्रकृती खालावल्याने तसेच रात्रभर थंडीने गारठून बुधवारी सकाळी दहा वाजता त्या पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. बाळू नाथाराम गीते असे मृत पर्यटकाचे नाव आहे. मृत बाळू गीते यांच्यासोबत असणारे सहकारी पर्यटक अनिल मोहन आंबेकर, गोविंदा दत्तात्रय आंबेकर, तुकाराम आसाराम टिपाले, महादेव जगन भुतेकर, हरिओम विठ्ठल बोरुडे हे सर्व पुणे जिल्ह्यातील असून हरिश्चंद्रगडावर येताना ते जंगलात रस्ता भरकटले होते .अजूनही काही मुंबईकडील पर्यटक चुकले होते. ते रस्ता शोधत असताना त्यांना मृत बाळू गीते आणि त्यांचे सहकारी भेटले. रस्ता शोधत काही पर्यटकांनी खिरेश्वर येथील स्थानिकांना कळविले असता वनविभागाच्या मदतीने राजुर पोलिसांनी रेस्क्यू केले. यामध्ये वनविभागाचे महादू रेंगडे, गाईड बाळू रेंगडे, विजय नाणेकर, पुरव मेमाने यांनी बाळू गीतेसह बाकीच्या पर्यटकांना गडावरून खाली आणले. त्यातील तीन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून बाळू गीते यांचा मृतदेह तपासणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील राजुर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

गाईडला घेऊनच पर्यटनस्थळाचा प्रवास करावा 

सध्या पावसाळ्यात जुन्नर तालुक्यात पर्यटकांचा ओघ वाढत आहे. गडकिल्ल्यांवर दाट धुके असल्यामुळे रस्ते दिसेनासे होत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी पर्यटनस्थळी असणाऱ्या गाईडला घेऊनच पर्यटनस्थळाचा प्रवास करणे गरजेचे आहे. - सचिन कांडगे, सहायक पोलिस निरीक्षक, ओतुर

टॅग्स :PuneपुणेFortगडtourismपर्यटनSocialसामाजिकTrekkingट्रेकिंगDeathमृत्यू