शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत ६ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 20:10 IST

- थेट महाविद्यालयात साेमवारपासून करता येणार प्रवेश निश्चित; दुसरी फेरी नऊ जुलैला

पुणे : राज्यात अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्तायादी शनिवारी (दि. २८) सायंकाळी प्रसिद्ध झाली आहे. या कॅप राउंड १ मध्ये एकूण ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय जाहीर झाले आहेत. यानुसार विद्यार्थ्यांनी साेमवारी (दि.३०) प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. तसेच काेटांतर्गत ६० हजार ४८७ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश निश्चित केला आहे. दुसऱ्या फेरीसाठी दि. ९ जुलै रोजी रिक्त जागा प्रदर्शित केल्या जाणार आहेत, अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.

या फेरीत एकूण १० लाख ६६ हजार ५ विद्यार्थ्यांनी अर्ज केला हाेता. त्यापैकी ६ लाख ९ हजार ७१८ विद्यार्थी विज्ञान शाखेचे हाेते. त्यातील ३ लाख ४२ हजार ८०१ विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. वाणिज्य शाखेसाठी २ लाख २४ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी अर्ज केला हाेता. त्यातील १ लाख ३९ हजार ६०२ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत महाविद्यालय मिळाले आहे. त्याखालाेखाल कला शाखेचा क्रमांक लागताे. या फेरीत एकूण २ लाख ३१ हजार ३५६ अर्ज आले हाेते. त्यापैकी १ लाख ४९ हजार ७९१ विद्यार्थ्यांना महाविद्यालय निश्चित करता येणार आहे.

४ लाख ५७ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

महाविद्यालय निवडीसाठी विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरण्यासाठी १० पर्याय उपलब्ध हाेते. विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि महाविद्यालयाचा कट ऑफ यानुसार पसंतीक्रमानुसार महाविद्यालय देण्यात आला आहे. यात १० लाख ६६ हजार ५ विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय जाहीर करण्यात आले आहे. यापैकी ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पहिल्या पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळाले आहे. तसेच ७७ हजार ९९ विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या दुसऱ्या पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळाला आहे. दहाव्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २ हजार १४६ आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEducationशिक्षण