शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पोलिसांकडून प्रा.आनंद तेलतुंबडे यांची ६ तास कसून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 20:00 IST

आनंद तेलतुंबडे यांची सायंकाळपर्यंत चौकशी करण्यात आली असून आता पुढील चौकशी १९ फेब्रुवारीला होणार आहे़. 

ठळक मुद्देमाओवादी संघटनांशी संबंधाची घेतली माहिती १४ व १९ फेब्रुवारीला पोलिसांकडे हजर राहण्याचे आदेश; त्यावर २२ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी

पुणे : बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप असलेले प्रा.आनंद तेलतुंबडे यांची पुणेपोलिसांनी गुरुवारी ६ तास चौकशी केली़. या प्राथमिक चौकशीत त्यांचा माओवाद्यांशी कसा संबंध आला, याविषयी पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घेतली़ त्यांची पुन्हा १९ फेब्रुवारी रोजी चौकशी होणार आहे़. एल्गार परिषदेत माओवाद्यांचा संबंधावरुन पोलिसांनी केलेल्या तपासात आनंद तेलतुंबडे यांचा बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याचे उघड झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता़. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती़. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ११ फेब्रुवारीपर्यंत सक्षम न्यायालयात जामीनासाठी अर्ज करायला सांगून तोपर्यंत अटकेपासून सरंक्षण दिले होते़. पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज १ फेब्रुवारी रोजी फेटाळला होता़. त्यानंतर दुसºया दिवशी २ फेब्रुवारीला ते केरळहून मुंबई विमानतळावर उतरताच पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली होती़. त्यांना पुण्यातील न्यायालयात हजर केल्यावर तेलतुंबडे यांनी आपल्याला ११ फेब्रुवारीपर्यंत सरंक्षण दिले आहे़. आपण पोलिसांना तपासात सहकार्य करायला तयार असल्याचे सांगितले होते़. त्यानंतर न्यायालयाने त्यांची अटक बेकायदेशीर ठरवून त्यांना सोडून देण्याचा आदेश दिला होता़. याविरोधात पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती़. न्यायालयाने पुणे पोलिसांचे म्हणणे ऐकून घेऊन तेलतुंबडे यांना १४ व १९ फेब्रुवारी रोजी पोलिसांकडे हजर राहण्याचे आदेश देऊन त्यावर २२ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे़. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आनंद तेलतुंबडे हे एल्गार परिषद गुन्ह्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या कार्यालयात गुरुवारी सकाळी १० वाजता हजर झाले़. पोलिसांनी त्यांची बंद खोलीत चौकशी सुरु केली़. या चौकशीत माओवादी चळवळीशी आपला कसा संबंध आला़ चळवळीचा प्रभाव वाढविण्यासाठी आपण काय केले़ कशासाठी केले आणि का केले़ माओवादी संघटनांवर बंदी असताना त्यांच्याशी संपर्क कशासाठी ठेवला अशाप्रकारे प्रश्न त्यांना विचारण्यात आले़. दुपारी २ पर्यंत ही चौकशी झाली़ त्यानंतर जेवणासाठी काही वेळ चौकशी थांबविण्यात आली़ त्यानंतर ३ वाजता त्यांची पुन्हा चौकशी सुरु झाली़. .याबाबत आनंद तेलतुंबडे यांनी सांगितले की, आपण पोलिसांना तपासासाठी सहकार्य करीत असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्याबाबत अधिक काही सांगता येणार नाही़. तेलतुंबडे यांची सायंकाळपर्यंत चौकशी करण्यात आली असून आता पुढील चौकशी १९ फेब्रुवारीला होणार आहे़. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय