शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पुणे शहरातील ५ वी ते ८ वीच्या शाळा १ फेब्रुवारीपासून होणार सुरू : पालिका आयुक्तांचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 20:20 IST

शाळा सुरू करण्याआधी शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा निर्माण करणे आवश्यक

ठळक मुद्देशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक

पुणे : राज्य शासनाने इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आता पालिकेनेही शहरातील शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून या शाळा सुरू होणार आहेत. याबाबतचा आदेश पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला. शाळा सुरू करण्याआधी शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. यासोबतच थर्मामीटर, थर्मल गन,  ऑक्सिमिटर, जंतुनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तूंबाबत शाळा प्रशासनाने दक्षता घेणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कुलबस, स्कुल व्हन आदी वाहनांचे निर्जंतुकीकरण नियमित होण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने पडताळणी करणे आवश्यक राहणार आहे.  शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असून चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनाने परिमंडळ वैद्यकीय अधिकारी व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांना सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे. वर्गखोल्या तसेच स्टाफरूम मधील बैठक व्यवस्था सुरक्षित अंतराच्या नियमानुसार असावी. तसेच वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी या प्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी लागणार आहे. शाळेत दर्शनी भागावर सुरक्षित अंतर, मास्कच्या वापरासंदर्भात मार्गदर्शकसूचना असणारे फलक लावणे आवश्यक असून शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहताना मुलांमध्ये किमान ६ फुट अंतर राखावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी सहमती आवश्यक असून ही सहमती शिक्षण पर्यवेक्षक प्राथमिक शिक्षण विभाग यांना सादर करावी लागणार आहे. शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ करणे व स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळा वाहतुकीच्या वाहनांचे दिवसातून किमान दोन वेळा (विद्यार्थी वाहनात बसण्याअगोदर व उतरल्यानंतर ) निर्जंतुकीकरण करण्यात यावे. वर्ग कोणत्याही परिस्थितीत बंद खोल्यांमध्ये भरवण्यात येऊ नये. हवा खेळती राहण्यासाठी वर्ग खोल्यांची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाEducationशिक्षणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका