57 lakh rupees costed Gutkha seized in Pune | पुण्यात ५७ लाखांचा गुटखा जप्त 
पुण्यात ५७ लाखांचा गुटखा जप्त 

पुणे  : राज्यात गुटखा बंदी असतांनाही मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची विक्री आजही पानटप-यांवर होत आहे. मंगळवारी पोलीसांनी लोणीकंद येथील उबाळे नगर येथील एका गोडाऊन वर छापा टाकत तब्बल ५७ लाख ५० हजार रूपयांचा गुटखा जप्त केला. आतापर्यंतची या परिसरातील ही मोठी कारवाई असून यामुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे.   

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  या प्रकरणी  विरमाराम बिजलाजी तराडीया (वय ३० रा.शिवाजीनगर) याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. हाके यांना खब-यांमार्फत उबाळे नगर येथे अवैध गुटख्याचा मोठा  साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस उप निरीक्षक संतोष लांडे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी आणि अन्न सुरक्षा अधीकारी  सावंत व स्टाफ यांच्या मदतीने मॅपल हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या  बंद गोडाऊनची पहाणी केली. यात पोलीसांना 
बिजलाजी तराडीया याला  नरेंद्र उबाळे यांनी भाडयाने दिल्याचे समजले. पोलीसांनी नरेंद्र उबाळे यांच्यासमक्ष गोडाउनची तपासणी केली असता त्यामध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला  ४५ लाख २३ हजार ५२० रुपए किंमतीचा महक सिल्व्हर पान मसाल्याचे  २८ ह जार २७२ पॅकेट, १२ लाख ३३ हजार २३२ रूपयांचे किंमतीच्या ‘एक -१ जर्दाचे एकुण २८ गहजार २८ पॅकेट असा एकूण  ५७ लाख ५६ हजार ७५२ रूपयांचा गुटखा जप्त केला.  

 

Web Title: 57 lakh rupees costed Gutkha seized in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.