Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 10:24 IST2026-04-07T10:20:38+5:302026-04-07T10:24:24+5:30

Baramati bypoll Election: सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर

55 applications filed against Sunetra Pawar in Baramati Congress Akash More's application also filed calls withdrawn | Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार

Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार

लोकमत न्यूज नेटवर्क, बारामती/मुंबई: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी एकूण ५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून आकाश मोरे यांनीही अर्ज भरला. तर ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी निवडणुकीतून माघार घेतली. उमेदवार मोठ्या संख्येने असले तरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे अजित पवार गटाचे प्रयत्न सुरू आहेत.

सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर

कविवर्य मोरोपंत नाट्यगृह येथे महायुतीचा सर्वपक्षीय कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. बारामतीचा प्रत्येक नागरिक हा दादांसाठी पांडुरंग होता, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करत सुनेत्रा पवार यांना ‘बारामतीची माउली’ असे संबोधले.

उमेदवार देण्याचा काँग्रेसला अधिकार : शरद पवार

काँग्रेस हा मोठा आणि स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणे हा त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक निवडणुकीत कुणीतरी विरोधात लढणारच, हे गृहीत धरूनच रिंगणात उतरावे लागते. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध न होण्याबाबत अधिक चर्चा करण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

राहुरी पोटनिवडणुकीत तनपुरेंची अचानक माघार

राहुरी (जि.अहिल्यानगर): राहुरी पोटनिवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपशी झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादीचे (शरद पवार) संभाव्य उमेदवार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अचानक माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीने ऐनवेळी गोविंद मोकाटे यांचा अर्ज भरला. भाजपकडून दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले हे मैदानात आहेत. काँग्रेसकडूनही दोन जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

Web Title : बारामती में सुनेत्रा पवार के खिलाफ 55 आवेदन; हाके ने नाम वापस लिया

Web Summary : बारामती उपचुनाव के लिए सुनेत्रा पवार ने नामांकन दाखिल किया। कांग्रेस के आकाश मोरे ने भी आवेदन किया। ओबीसी नेता हाके ने नाम वापस लिया। शरद पवार ने कांग्रेस के चुनाव लड़ने का समर्थन किया।

Web Title : 55 applications against Sunetra Pawar in Baramati; Hake withdraws

Web Summary : Sunetra Pawar filed nomination for Baramati by-election amid efforts for unopposed election. Congress's Akash More also applied. OBC leader Hake withdrew. Sharad Pawar supports Congress contesting.