शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

चाफेकर पुतळा ते संचेती हॉस्पिटल रस्ता रुंदीकरणातील ५२ मिळकती ताब्यात घेतल्या जाणार

By राजू हिंगे | Updated: April 12, 2024 19:53 IST

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर

पुणे: शिवाजीनगर गणेशखिंड रस्ता येथील चाफेकर पुतळा ते संचेती हॉस्पिटल दरम्यानच्या ४५ मी. डी. पी. रस्ता रुंदीसाठी आरक्षित जागा नवीन भूसंपादन कायदा २०१३नुसार संपादन केली जाणार आहे. त्यात ५२ मिळकतींचा समावेश आहे. संबंधित मिळकतधारकांनी तडजोडीने जागा ताब्यात देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता भूसंपादन कायद्याचा वापर करून या मिळकती ताब्यात घेतल्या जाणार आहेत. त्याबाबतच्या  प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.  

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. मंजूर विकास आराखड्यानुसार ४५ मी. डी. पी. रस्ता रुंदीकरणासाठी जागा ताब्यात घेतली जाणार आहे. चाफेकर पुतळा ते संचेती हॉस्पिटल दरम्यानच्या रस्त्याची उजवी बाजू व डावी बाजूच्या बाधित मिळकतींचे भूसंपादन कायद्यान्वये भूसंपादन करणेबाबत आदेश देण्यात आले आहेत. त्यानुषंगाने मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने बाधित मिळकतधारकांना तडजोडीने बाधित मिळकती ताब्यात घेणेबाबत पत्र दिलेली आहेत. तथापि बाधित मिळकतधारकांनी तडजोडीने बाधित मिळकती ताब्यात देण्यास नकार दिल्याने मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने नमूद मिळकती भूसंपादन कायद्याद्वारे संपादित करण्यात येणार आहेत. या रस्त्याच्या डावी बाजूकडे बाधित क्षेत्र ७ हजार ०६७ चौरस मीटर क्षेत्राच्या एकूण २५ मिळकती, तर या रस्त्याच्या उजव्या बाजूकडे बाधित होणारे क्षेत्र ७ हजार ०६३ चौरस मीटर असून, एकूण २७ मिळकती आहेत.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६चे कलम १२६ अन्वये भूसंपादन करण्यात येत आहे. या कलमामध्ये नियोजन प्रधिकरणास, विकास प्राधिकरणास भूसंपादनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया सुरू करणेपूर्वी भूसंपादन प्रस्तावास स्थायी समितीमार्फत सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार स्थायी समितीपुढे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला होता. त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. 

भूसंपादनासाठी १४४ कोटीची गरज

पुणे महापालिकेने बाधित क्षेत्राचा तडजोडीने ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या क्षेत्राची भूसंपादन कायद्यान्वये भूसंपादन करण्याची प्रक्रियादेखील समांतर चालू करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे पाठविणेबाबत महापालिका आयुक्त यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार १४ हजार १३१ चौरस मीटर जागेचे संपादन कायद्यादारे संपादित करण्यासाठी सुमारे १४४ कोटीची आवश्यकता आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSocialसामाजिकMONEYपैसाGovernmentसरकार