‘कामधेनू’मुळे ५० हजार लिटर दूधसंकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:19 IST2018-04-10T01:19:17+5:302018-04-10T01:19:17+5:30

जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत कामधेनू योजनेच्या अंमलबजवणीबाबत अक्षरक्ष: वाभाडे काढल्यानंतर त्याची चौैकशी सुरू असताना कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने मात्र या योजनेमुळे दूध उत्पादनाचा टक्का वाढल्याचा दावा केला आहे.

50 thousand liters of milk collection due to Kamdhenu | ‘कामधेनू’मुळे ५० हजार लिटर दूधसंकलन

‘कामधेनू’मुळे ५० हजार लिटर दूधसंकलन

पुणे : जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत कामधेनू योजनेच्या अंमलबजवणीबाबत अक्षरक्ष: वाभाडे काढल्यानंतर त्याची चौैकशी सुरू असताना कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने मात्र या योजनेमुळे दूध उत्पादनाचा टक्का वाढल्याचा दावा केला आहे. सदस्यांच्या मते कागदावरच राहिलेली योजना अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार त्या गावांत दिवसाला ५० हजार लिटर दूधसंकलन होत आहे. यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीबाबत उत्सुकता वाढली आहे.
कामधेनू दत्तक योजना जिल्ह्यात कागदावर राहिल्याची खंत सर्वसाधारण सभेत सत्ताधाºयांसह विरोधी जिल्हा परिषद सदस्यांनी मांडत चौैकशीची मागणी केली होती. अधिकारी ही योजना शेतकºयांपर्यंत पोहचविण्यात अपयशी ठरले आहेत. त्याच्या कसल्याही गाईडलाईन नाही, शिबीरं होत नाहीत व याची कुणालाही माहिती करून दिली जात नाही. एकाही शेतकºयाला ही योजना माहित नाही, असे आरोप करण्यात आले. त्यामुळे याची चौैकशी करण्याचे अश्वासन जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिले. त्यानुसार याची चौैकशीसाठी समिती नेमल्याचे सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी सांगितले. मात्र कृषी व पशूसंवर्धान विभागाने २०१६-१७ मध्ये या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १८४ गावांची निवड करण्यात आली होती. त्या गावांत दरदिवशी ५० हजार लिटर दुधाचे उत्पादन वाढले आहे. पशुपालकांसाठी ही योजना फायदेशीर ठरत असून, जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने ही योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
दूध उत्पादनवाढीसाठी पशुपालक मंडळाची स्थापना करण्यात आली. यात डेअरीचे अध्यक्ष तसेच पशुपालकांचा गट बनविण्यात आला. ग्रामसभेत जनावरांच्या वंधत्व निवारणासाठी तसेच इतर आजार रोखण्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती पशुपालकांना देण्यात आली. वर्षभरात १ हजार १४० जनावरांचे वध्यंत्व निवारण करण्यात आले. परिणामी या गावातील १० हजार ५६ गाई तसेच म्हशी गाभण राहिल्या. या जनावारांना खाद्य पुरवण्यासाठी १ हजार ३६६ हेक्टरवर चाºयाची लागवड करण्यात आली होती. यातून जवळपास ८९ हजार ८४५ टन जनावरांच्या खाद्यानाचे उत्पादन झाले.
ही योजना राबविण्यापूर्वी या गावातील दुधाचे उत्पादन प्रतिदिन ३ लाख ९ हजार १७३ लिटर एवढे होते. कामधेनू योजनेअंतर्गत पशुपालकांना करण्यात आलेल्या मार्गदर्शनामुळे तसेच राबविण्यात आलेल्या विविध योजनांमुळे दूध उत्पादनात प्रतिदिन जवळपास ५० हजार लिटरने वाढ होऊन हे उत्पादन प्रतिदिन ३ लाख ५८ हजार ३६० लिटर एवढे झाल्याचा दावा केला आहे.
>योजनेचे यश पाहून २०१७-१८ या वर्षात ६६ गावांमध्ये ही योजना राबविण्यात आली आहे. याही गावात चांगला प्रतिसाद या योजनेला मिळाला असून, दुधाचे उत्पादन वाढणार आहे. मे महिन्यात या गावांतील दूध उत्पादनवाढीचा अहवाल येईल.
-श्रीराम पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
>बोगस आकडेवारी दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मूळात तालुक्यानुसार वाढलेले दूध उत्पादन दाखविले आहे. मात्र कोणत्या गावात योजना राबविली व तेथे किती दूध उत्पादन वाढले याची सविस्तर माहिती कृषी व पशुसंवर्धन विभागाकडे नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौैकशी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. चौैकशीअंती दूध का दूध, पानी का पानी होईल. - शरद बुट्टे पाटील, गटनेता, भाजपा
>या योजनेत सहभागी पशुपालकांचे मेळावे घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जनावरांच्या वंध्यत्व निवारणासाठी तसेच खाद्यान्नवाढीसाठीही प्रयत्न करण्यात आले. यामुळे दुधाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. भविष्यात दुसºया टप्प्यात आणखी काही गावांत ही योजना राबवून दूध उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
- सुजाता पवार, सभापती, कृषी आणि पशुसंवर्धन
>तालुका गावे वाढलेले दूध (लिटर)
जुन्नर २१ २५००
आंबेगाव २१ ४५४८
दौंड २७ ६५७१
हवेली ९ ४७०७
मावळ १० ३५२४
मुळशी २ ३४२
वेल्हे ५ ५९८
भोर ४ ११८
पुरंदर ११ २५५३
शिरूर १० ३९६०
बारामती १८ ८७२३
इंदापूर २५ ६२४८
खेड १९ ५१६५

Web Title: 50 thousand liters of milk collection due to Kamdhenu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.