शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Pune Ganeshotsav: पुण्यात गणेश मंडळाच्या मिरवणुकीत एका पथकात ५० ढोल अन् १० ताशा; नवीन मंडळांसाठी 'या' अटी - शर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 15:35 IST

विसर्जनावेळी दोन मंडळांमध्ये अंतर पडू न देता मिरवणूक प्रवाही राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे

पुणे: पुण्यातील गेणशोत्सवात (Pune Ganeshotsav) पोलिसांकडून मंडळांना मिरवणूक, वाहतूककोंडी याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच नव्या मंडळाच्या परवानगीसाठी असलेल्या अटी-शर्ती यांची यादी पोलिसांनी जाहीर केली आहे. यंदा गणेश मंडळाच्या मिरवणुकीत एका पथकात (Dhol Pathak) ५० ढोल अन् १० ताशांना पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. तर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी परिसरातील मैदाने, शाळा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली आहे. (Pune Police) 

ढोल पथकांची संख्या निश्चित करा..

गेल्यावर्षी एका गणेश मंडळाच्या मिरवणुकीत एका ढोल पथकात ५० ढोल आणि १० ताशा अशी संख्या निश्चित करण्यात आली होती. यंदा देखील तीच संख्या निश्चित करण्यात आली असून, जास्तीत जास्त ३ ढोल पथकांचा समावेश गणेश मंडळांना करता येणार आहे. ती संख्या निश्चित करून पोलिसांना सांगा, अशा सूचनादेखील गणेश मंडळांना करण्यात आल्या आहेत.

पोलिसांकडून आम्हाला सकारात्मक सहकार्य..

शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी पोलिसांकडून आम्हाला सकारात्मक सहकार्य मिळत असून, मंडळांनी देखील पोलिसांना सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. गणेशोत्सवाच्या काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी परिसरातील मैदाने, शाळा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी गणेश मंडळांनी पोलिसांकडे केली.

नवीन मंडळांच्या परवानगीसाठी असलेल्या अटी-शर्ती..

- २०२२ मध्ये परवानगी घेतलेल्या गणेश मंडळांना २०२६ पर्यंत (५ वर्षे) परवानगी.- नवीन गणेश मंडळांची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी व त्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे.- मिरवणुकीत देखाव्यांची उंची जमिनीपासून १४ फुटांपेक्षा जास्त आणि रुंदी १० फुटांपेक्षा जास्त नसावी.- रात्री १० पर्यंत कार्यक्रमांना परवानगी.- कमान, स्टेज आणि मंडप उभारण्यासाठी अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र, वाहतूक शाखेचे, विद्युत जोडणीसाठी विद्युत निरीक्षकाचे प्रमाणपत्र यासाठी एक खिडकी योजना.- परवानगी घेतलेल्या आकाराचाच मंडप उभारणे आवश्यक.- गणेश मंडळात सीसीटीव्ही असणे बंधनकारक.- महिलांची छेडछाड होणार नाही याची याबाबत दक्षता ठेवणे गरजेचे.- धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे.- प्रखर बीम लाइट नको.- दोनच स्पीकर लावून आवाजाची मर्यादा पाळावी.

गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अधिक सुधारणा केल्या जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीचे नियोजन चांगल्या प्रकारे केले जाणार आहे. विसर्जनावेळी दोन मंडळांमध्ये अंतर पडू न देता मिरवणूक प्रवाही राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. जेणेकरून विसर्जन मिरवणूकदेखील वेळेत संपेल. शहरातील गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्न पार पडावा, यासाठी पोलिस दल सज्ज आहे. - संदीपसिंह गिल, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १

टॅग्स :PuneपुणेGaneshotsavगणेशोत्सवganpatiगणपतीSocialसामाजिकPoliceपोलिसcommissionerआयुक्त