शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Pune | धड आणि हातपायाचे ५ तुकडे, मुंडके मात्र गायब; भिगवण परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 19:45 IST

भिगवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून दिला...

भिगवण (पुणे) : भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तक्रारवाडी गावच्या हद्दीत धारदार शस्त्राने तुकडे करून पिशवीत भरलेल्या अवस्थेत मृतदेह उजनीच्या पाण्यात आढळून आल्याने खळबळ माजली. मासे वाहून नेण्याच्या प्लास्टिक पिशवीत धड आणि हातपायाचे ५ तुकडे सापडले. भिगवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून दिला.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उजनीच्या फुगवट्या शेजारी प्लास्टिक पिशवीत हा मृतदेह आढळून आला आहे. यात पुरुष जातीच्या शरीराचे हात पाय आणि धड असे ५ तुकडे आढळून आले. तर यात मुंडके मात्र आढळून आले नाही. याबाबत भिगवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून दिला. ३० ते ३५ वर्ष वयाच्या पुरुषाचा मृतदेह असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली.

अज्ञात ठिकाणी खून करून त्याच्या शरीराचे ५ तुकडे करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र मृतदेहाचे मुंडके यात आढळून आलेले नाही. त्यामुळे सदर खून इतर ठिकाणी करून उजनीच्या पाण्यात मृतदेह टाकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात तक्रारवाडी गावचे पोलीस पाटील अमर धुमाळ यांनी तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास सुरु करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

अत्यंत निर्दयीपणे मृतदेहाचे तुकडे केले असून मांडी पासून पायाचे तर खांद्यापासून हाताचे दोन तुकडे केले आहेत. मुंडके मानेतून कापण्यात आले असल्याची शक्यता आहे. या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे,अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी घटनास्थळी भेट देत गुन्ह्याची माहिती घेतली.

या अगोदरही महिलेच्या शरीराचे ९ तुकडे आढळले होते- बाहेरगावी खून करून मृतदेह भिगवण येथील उजनीच्या पाण्यात टाकण्याची ही तिसरी वेळ आहे. या अगोदर एका महिलेच्या शरीराचे ९ तुकडे करून टाकल्याची घटना घडली होती. भिगवण पोलिसांनी जंग जंग पछाडून तपास करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या गुन्ह्याचा उकल होवू शकला नाही. त्यामुळे या खुनाचा तपास हे पोलीसासमोरील आव्हान असल्याचे दिसून येत आहे. मात्र भिगवण पोलीस गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत आरोपींच्या मुसक्या आवाळतील असा विस्वास व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :PuneपुणेBhigwanभिगवणDamधरणCrime Newsगुन्हेगारी