शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Pune News: पुणे - नगर महामार्गावरील विचित्र अपघातात ५ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 10:14 IST

शिक्रापूर : पुणे -नगर महामार्गावरील शिक्रापूर येथे २४वा मैलनजीक ट्रकने कार आणि दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत पाच जण ठार ...

शिक्रापूर :पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथे २४वा मैलनजीक ट्रकने कार आणि दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत पाच जण ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली. अपघातातील एका जखमीला तत्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. विठ्ठल हिंगाडे, रेश्मा विठ्ठल हिंगाडे (रा. पारनेर), लिना निकसे (रा. दांडेकर पूल पुणे) व अन्य दोन जण (नावे समजू शकली नाहीत) यांचा मृत्यू झाला आहे.

घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गावरून रविवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास नगरच्या दिशेने ट्रक निघाला होता. त्यावेळी दुसऱ्या लेनवरून एक कार आणि दोन दुचाकी पुणे बाजूकडे येत होत्या. शिक्रापूर येथील २४ वा मैलनजीक अचानकपणे ट्रक दुभाजकावरून दुसऱ्या लेनवर गेला अन् समोरून येणाऱ्या दोन दुचाकी आणि कारला जोराची धडक दिली.

यामध्ये एका दुचाकीवरील हिंगाडे दाम्पत्याचा, कारमधील लिना निकसे तसेच अन्य एक जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, दोन जखमींना रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेत एका जखमीचा मृत्यू झाला. अन्य दोन मृतांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तसेच अपघात नेमका कसा झाला हे देखील समजू शकले नाही.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातShikrapurशिक्रापूरMaharashtraमहाराष्ट्र