शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बदली धोरणाविरोधात शिक्षक संघटनांचा ४ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 19:26 IST

नवीन शिक्षक बदलीधोरणाच्या विरोधात शिक्षक संघटना ४ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरीय मोर्चा काढणार असून यात पुणे जिल्ह्यातील १० हजार शिक्षक सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्देतीन टप्प्यात आंदोलनाची दिशा, ४ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरीय मोर्चापुणे जिल्ह्यातील १० हजार शिक्षक होणार सहभागी : बाळासाहेब मारणेमागण्या मान्य न झाल्यास राज्यस्तरीय मोर्चा काढ्याचे नियोजन

पुणे : नवीन शिक्षक बदलीधोरणाच्या विरोधात पुण्यात सर्व शिक्षक संघटना एकत्रित आल्या असून तीन टप्प्यात त्यांनी आंदोलनाची दिशा ठरविली आहे. ४ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरीय मोर्चा काढण्यात येणार असून यात पुणे जिल्ह्यातील १० हजार शिक्षक सहभागी होणार असल्याचे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सोमवारी सासवड येथे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या सभेत राज्यव्यापी आंदोलनाचा ठराव करण्यात आला होता. त्यानुसार पुढील दिशा ठरविण्यासाठी बुधवारी पुण्यात बैैठक घेण्यात आली. या बैैठकीला त्यांनी सर्वच शिक्षक संघटनांना आमंत्रित केले होते. त्यानुसार बहुतांश शिक्षक संघटना आज एकत्रित आल्या व सर्वांनी या धोरणाविरोधात लढा देण्याचे ठरविले आहे. यावेळी शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, शिक्षक समितीचे अध्यक्ष काळूराम बोरसे, शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट)चे अध्यक्ष राजाराम वरुटे, मधुकर काठोळे, मागासवर्गीय संघटनेचे शामराव जवंजाळ, राजेश सुर्वे, काशिनाथ भोईर, चिंतामण वेळवडे, अंबादास वाजे, आप्पासाहेब कुल, एन. वाय. पाटील, उदय शिंदे, रावसाहेब रोहकले आदी राज्य पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण राज्यात एकाच वेळी भव्य मोर्चे करण्याचे नियोजन झाले.त्यानुसार पहिल्या टप्प्यात ४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पुण्यातील आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा होणार असून १० हजार शिक्षक यात सहभागी होणार आहेत. यानंतर त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यस्तरीय मोर्चा काढ्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात राज्यातील ४ लाख शिक्षक मोर्चा काढणार आहेत. आझाद मैदानावर हा मोर्चाचे संघटनांचे नियोजन आहे.  यानंतरही शासनाने धघेरण बदलले नाही तर मात्र शिक्षक सामुहिक रजेवर जावून शाळा बंद करतील असा इशारा आज या संघटनांनी दिला आहे. अंगणवाडी, एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनापेक्षा मोठे आंदेलन शिक्षकांचा होईल असे, मारणे यांनी सांगितले. 

शिक्षक प्रतिनिधींशी संवादाची पद्धत बंद केल्याने शासनावर ही वेळ आली आहे. राज्यभरातून चार लाख शिक्षक एकाच वेळी रस्त्यावर उतरतील.- बाळासाहेब मारणे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ पुणे

सहभागी प्रमुख संघटनामहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीमहाराष्ट्र राज्य पदवीधर व केंद्रप्रमुख संघटनाअखिल शिक्षक संघमहाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनामहाराष्ट्र राज्य शिक्षक सेनामहाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटनाजूनी पेन्शन हक्क संघटनउर्दु शिक्षक संघटनाएकल शिक्षक संघटना स्वाभिमानी शिक्षक संघटना

प्रमुख मागण्यानवीन बदली धोरण दुरुस्ती करावीनवीन वरिष्ठ वेतनश्रेणी आदेश रद्द करावाअंशदायी पेन्शन योजना बंद करून जूनी पेन्शन योजना लागू करावीअनावश्यक आॅनलाईन कामे बंद करावी

टॅग्स :agitationआंदोलनTeacherशिक्षकMaharashtraमहाराष्ट्र