शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा एलआयसी कार्यालयाची कॅशव्हॅन लुटत ४८ लाखांची रोकड पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 16:46 IST

कॅशव्हॅनच्या कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राचे वार करून भरदिवसा चोरट्यांनी ४८ लाखांची रोकड असलेली पैशांची पिशवी पळविली .

ठळक मुद्देएलआयसी कार्यालयाची २२ लाख व इतर बँकाची रक्कम अशी मिळून अंदाजे ४८ लाखांची रोकड

पिंपरी : एलआयसी कार्यालयातून रक्कम घेण्यासाठी आलेल्या कॅश व्हॅनच्या कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राचे वार करून भरदिवसा चोरट्यांनी ४८ लाखांची रोकड असलेली पैशांची पिशवी पळविली . ही घटना गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास निगडीतील यमुनानगरमध्ये घडली. या व्हॅनमध्ये एलआयसी कार्यालयाच्या २२ लाख रकमेसह इतर बँकाची रक्कम मिळून अंदाजे ४८ लाखांची रोख रक्कम अज्ञात हल्लेखोरांनी पळविली. हल्लेखोरांनी शस्त्राचे वार करून व्हॅनचालक तसेच अन्य एकास जखमी केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  कॅश व्हॅन घेऊन जात असताना हल्लेखोरांनी केलेल्या हल्यात महेश पाटणे (रा. हडपसर) हे जखमी झाले. त्यांच्याबरोबर भाऊसाहेब टकले (वय ३८, रा. म्हातोबानगर, कोथरुड) हे व्हॅन चालकासोबत गाडीमध्ये होते. त्यांनाही हल्ल्यात दुखापत झाली आहे. यमुनानगर येथील एलआयसी कार्यालयातून रोख रक्कम घेऊन जाण्यासाठी (एमएच ०२ एक्स ए ४६९९) ही व्हॅन घेऊन दोन जण आले. कार्यालयातून घेतलेली रक्कमेची पिशवी व्हॅनमध्ये ठेवत असताना अज्ञात चार जणांनी चालकावर वार केले. चालकाला जखमी करून रोकड असलेली बॅग हिसकावली. त्याचवेळी चालकाबरोबर असलेल्या भाऊसाहेब टकले यांनाही हल्लेखोरांनी मारहाण केली. रोख रक्कमेची पिशवी घेवून हल्लेखोर पसार झाले. यमुनानगर येथील एलआयसी कार्यालयाची २२ लाख व इतर बँकाची रक्कम अशी मिळून अंदाजे ४८ लाखांची रोकड त्यांनी पळविली आहे. हल्लेखोर दोन दुचाकीवरून पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :nigdiनिगडीCrimeगुन्हाPoliceपोलिसMONEYपैसाtheftचोरी