शहरात चार तासांत ४६६ आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:18 IST2021-02-05T05:18:54+5:302021-02-05T05:18:54+5:30
पुणे : शहरातील पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने एकत्रितपणे राबविलेल्या ''कोंबिग ऑपरेशन'' अंतर्गत सराईत गुन्हेगार व अवैध धंद्यावर गुरुवारी ...

शहरात चार तासांत ४६६ आरोपी जेरबंद
पुणे : शहरातील पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने एकत्रितपणे राबविलेल्या ''कोंबिग ऑपरेशन'' अंतर्गत सराईत गुन्हेगार व अवैध धंद्यावर गुरुवारी ( दि.२८) प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. या आरोपी चेकिंग अभियानमध्ये परिमंडळनिहाय पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने एकूण २०३६ गुन्हेगार चेक केले. त्यापैकी ७०५ गुन्हेगार सापडले असून, प्रतिबंधक कारवाईच्या ४८० केसेस करून ४६६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारांवर करडी नजर ठेवली आहे. त्यानुसार कारवाई करण्यासाठी तत्परता दाखवली जात आहे. गुन्हेगाराला पकडण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात येत आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी परिमंडळीय पोलीस उप आयुक्त व पोलीस उपआयुक्त गुन्हे यांना पुणे शहरात गुन्हेगार चेकिंग योजना राबवून गुन्हेगारांना चेक करुन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारी (दि.२८) ७ ते ११ दरम्यान कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये ४६६ आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून एकूण ४६ हजार ५५० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
.......