शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४४ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 09:57 IST

शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले

पुणे : शेअर बाजरात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एरंडवणे भागातील एका तरुणाची ४४ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक माहितीनुसार, तक्रारदार तरुण एरंडवणे भागात राहायला आहे. चोरट्यांनी ६ नोव्हेंबर रोजी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर, चोरट्यांनी तरुणाला रक्कम गुंतविण्यास सांगितले.

चोरट्यांच्या खात्यावर तरुणाने वेळोवेळी पैसे जमा केले. सुरुवातीला चोरट्यांनी तरुणाला परताव्यापोटी काही रक्कम दिली. त्यानंतर, त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली.

कारवाईची भीती दाखवून घातला गंडा 

मगरपट्टा येथील एका तरुणीला तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करून मनी लॉन्ड्रिंग झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणीची सहा लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका २४ वर्षीय तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. तुमच्या बँक खात्याचा मनी लॉन्ड्रिंगसाठी वापर झाला आहे, अशी भीती चोरट्यांनी तरुणीला दाखविली. मोबाइलवर संपर्क साधून राष्ट्रीय तपास यंत्रणेतील (एनआयए) अधिकारी बाेलत असल्याची बतावणी केली. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, अशी भीती दाखविली. तरुणीला बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. तरुणीची पाच लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक अमर काळंगे तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेshare marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसाcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसfraudधोकेबाजी