वा्मय क्षेत्रतील 44 पुरस्कार बंद
By Admin | Updated: October 19, 2014 01:43 IST2014-10-19T01:43:35+5:302014-10-19T01:43:35+5:30
गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणा:या वा्मय पुरस्कारांच्या संख्येत यंदा घट झाली आहे. पुरस्कारांच्या रकमेत मात्र वाढ करण्यात आली आहे.

वा्मय क्षेत्रतील 44 पुरस्कार बंद
गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणा:या वा्मय पुरस्कारांच्या संख्येत यंदा घट झाली आहे. पुरस्कारांच्या रकमेत मात्र वाढ करण्यात आली आहे.
मराठी साहित्य क्षेत्नात ज्यांच्या स्मृती कायम जपून ठेवाव्यात अशा पु. ल. देशपांडे, आचार्य अत्ने, वि. वा. शिरवाडकर, लोटू पाटील, डॉ. सलीम अली, राजर्षी शाहू महाराज, संत गाडगे महाराज अशा अनेकांची नावे स्मृती पुरस्कारांतून वगळली आहेत. साहित्यिकांना काही दिवसांपूर्वीच राज्य साहित्य पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले होते, त्यात ही माहिती उघड झाली.
इंदिरा संत, बी. रघुनाथ, संत तुकडोजी महाराज, यशवंतराव चव्हाण, विठ्ठल रामजी शिंदे, बॅरिस्टर नाथ पै, वा. ल. कुलकर्णी, भा. रा. तांबे आदी नावांच्या पुरस्कारांसाठी शासनाने साहित्य मागविलेल्या आवाहनामध्ये दिसून येत नाहीत. गेल्या वर्षापासून शासनाने पुरस्कारांची रक्कम 2क् हजारांवरून तब्बल एक लाखावर नेली; मात्न हे करीत असताना पुरस्कारांच्या संख्येला कात्नी मारत
ती संख्या 79वरून अवघी 35वर आणली आहे.
साहित्यिक नाराज
साहित्यिकांना प्रोत्साहन देणारी पुरस्कार योजना बंद झाल्यामुळे विविध प्रकारचे लेखन करणा:या साहित्यिकांनी नाराजी दर्शविली आहे. हे पुरस्कार पुन्हा सुरू करून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे आणि सर्व प्रकारच्या साहित्यांना या पुरस्कारांत शासनाने स्थान द्यावे, अशी माहिती ‘लोकमत’शी बोलताना साहित्यिक चंद्रकांत महामिन यांनी दिली.
वगळलेले स्मृती पुरस्कार
राजा केळकर (सर्वसामान्य ज्ञान), राम गणोश गडकरी, शाहीर अमर शेख,
व. गो. आपटे (नाटक व एकांकिका), गोपीनाथ तळवळकर, कवी दत्त,
ना. धो. ताम्हणकर (बाल कादंबरी), रेव्हरंड ना. वा. टिळक, दि. के. बेडेकर (ललित गद्य), उद्धव ज. शेळके (कादंबरी), बी. रघुनाथ (लघुकथा), मधुकर केचे (ललित गद्य), जयवंत दळवी (एकांकिका), अण्णासाहेब किलरेस्कर (नाटक), वि. स. खांडेकर (कादंबरी), पु. भा. भावे (लघुकथा), वि. द. घाटे (ललित गद्य), मामा वरेरकर (एकांकिका), आचार्य अत्ने (विनोद), र. धों. कर्वे (ललित विज्ञान), नरहर कुरुंदकर (समीक्षा आणि सौंदर्यशास्त्न), राजर्षी शाहू महाराज (क्र ीडा वा्मय), डॉ. सलीम अली (पर्यावरण), लोटू पाटील (नाटक), दादासाहेब धनवटे (एकांकिका), कुसुमावती देशपांडे (समीक्षा व सौंदर्यशास्त्न), महात्मा जोतिराव फुले (इतिहास), ना. गो. कालेलकर, दादोबा पांडुरंग (भाषाशास्त्न व व्याकरण), डॉ. एन. आर. तावडे (भौतिकशास्त्न व तंत्नविज्ञान), डॉ. वि. भि. कोलते (संपादित), संत गाडगे महाराज (आधारित), वा. रा. कांत (अनुवादित),
रा. ना. चव्हाण (संपादित), इंदिरा संत (काव्य), वि. वा. शिरवाडकर (नाटक), दत्तू बांदेकर (विनोद), कृष्णराव भालेकर (संकीर्ण), ग. त्र्यं. माडखोलकर (संशोधन), पु. ल. देशपांडे (ललितकला आस्वादपर लेखन), संत तुकडोजी महाराज (ललित विज्ञान), धनंजय कीर (चरित्न), यशवंतराव चव्हाण (आत्मचरित्न), वा. ल. कुलकर्णी (समीक्षा आणि सौंदर्यशास्त्न), क्र ांतिसिंह नाना पाटील (इतिहास), डॉ. धनंजय गाडगीळ (अर्थशास्त्न), बॅरिस्टर नाथ पै (राज्यशास्त्न व समाजशास्त्न), विठ्ठल रामजी शिंदे (बृहन्महाराष्ट्र पुरस्कार), भा. रा. तांबे,
वा. गो. मायदेव (कविता), वि. का. ओक, ग. ह. पाटील (चरित्ने)