शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने ४०० जणांची कोट्यवधींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 11:42 IST

शेअर बाजारात दीर्घ मुदतीसाठी तुमचे पैसे गुंतवून १८ ते २२ टक्के परतावा देतो, असे सांगून जवळपास ४०० जणांची कोट्यवधीची फसवणूक

पुणे - शेअर बाजारात दीर्घ मुदतीसाठी तुमचे पैसे गुंतवून १८ ते २२ टक्के परतावा देतो, असे सांगून जवळपास ४०० जणांची कोट्यवधीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

खडक पोलिसांनी याप्रकरणी  महेशकुमार भगवानदास लोहिया (रा. शिवसागर रेसिडेन्सी, सिंहगड रोड) आणि सुनिल पुरुषोत्तम सोमाणी (रा. रविराज हेरिटेज, बोपोडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवार पेठेतील शिवकन्या अँड शिवकन्या इन्व्हेस्टमेंट येथे नोव्हेंबर २०१६ ते २१ सप्टेंबर २०१९ दरम्यान घडल्याची माहिती मिळत आहे.

पिंपळे निलख येथील एका ५१ वर्षांच्या महिलेने याप्रकरणी  खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अनेक जणांनी सुनिल सोमाणी यांच्याकडून विमा पॉलिसी घेतल्या आहेत. सोमाणी याने महेशकुमार लोहिया हे शेअर मार्केटमध्ये तुमचे पैसे गुंतवून तुम्हाला चांगला परतावा देतील, असे सांगून त्यांच्याशी संपर्क करुन देत होते. लोहियाने दीघ मुदतीसाठी तुमचे पैसे गुंतवित आहे, असे सांगून त्यांना १८ ते २२ टक्के परतावा मिळेल, असे आश्वासन देत होता. या महिलेने देखील त्याचे ऐकून आपल्याकडील १० लाख रुपये त्याच्याकडे गुंतविले होते. लोहिया याने त्यांना त्यांच्या खात्याची खोटी माहिती देऊन तुमचे पैसे वाढत असल्याचे सांगत असे. प्रत्यक्षात त्याने ते १० लाख रुपये स्वत:चे खात्यात जमा केले. प्रत्यक्षात शेअर मार्केटमध्ये पैसे न गुंतविता २५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे फोन बंद असून त्यांचे ऑफिसही बंद आहेत ते लक्षात आल्यावर या महिलेप्रमाणेच आणखी १८ जणांनी खडक पोलिसांकडे धाव घेतली. तसेच त्यांनी ही आपली फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. त्यांच्या विरुद्ध आतापर्यंत ७ कोटी ६ लाख ३४ हजार ३३२ रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या दोघांनी सुमारे ४०० जणांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीshare marketशेअर बाजार