शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
4
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
5
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
6
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
7
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
8
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
9
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
10
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
11
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
12
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
13
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
14
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
15
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
16
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
17
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
18
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
20
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागात ४०० कार्यालयीन सहाय्यकांची होणार नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 19:42 IST

सहा महिन्यांकरिता केली व २०० ऐवजी ४०० जणांची कार्यालयीन सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय

ठळक मुद्देदरमहा साधारणत: एकवट मानधन म्हणून १९ हजार २५० रूपये वेतन दिले जाणार

पुणे : महापालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या कर आकारणी व कर संकलन विभागात मनुष्यबळाची कमतरता पडू नये व अधिकाधिक मिळकत कर जमा होण्यास मदत व्हावी. या उद्देशाने या विभागात सहा महिन्यांकरिता (सप्टेंबर,२०२० पासून) ४०० जणांची कार्यालयीन सहाय्यक म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे.     पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून २०० सेवकांची एकवट वेतनावर तीन महिने मुदतीकरिता नेमणुका करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्याअनुषंगाने कर आकारणी व कर संकलन विभागासाठी अनुभवी लिपिक टंकलेखक संवर्गात २०० जणांची कार्यालयीन सहाय्यक म्हणून तीन महिन्याकरिता नियुक्ती करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर करण्यात आला होता. परंतु, प्रशासनाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने उपसूचना देऊन ही मुदत सहा महिन्यांकरिता केली व २०० ऐवजी ४०० जणांची कार्यालयीन सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.      प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार प्रत्येक नियुक्त उमेदवारांना किमान वेतन कायद्यानुसार, दरमहा साधारणत: एकवट मानधन म्हणून १९ हजार २५० रूपये वेतन दिले जाणार आहे. या नव्या २०० नियुक्तीमुळे पालिकेच्या तिजोरीवर दरमहा ३८ लाख ५० हजार रूपये अतिरिक्त बोजा येणार होता. तो स्थायी समितीच्या उपसूचनेनुसार कार्यवाही अंती आता दुप्पटीवर जाणार आहे. सदर खर्च कर आकारणी व कर संकलन विभागाकडील अर्थ शिर्षकावर खर्ची करण्यात येणार आहे.                ---------------------बालेवाडी बाणेर येथील कोविड हॉस्पिटल    बालेवाडी येथील सर्व्हे नं.२०, २१ व बाणेर येथील सर्व्हे नं.१०९ या मिळकतीमध्ये अकोमोडेशन रिझर्वेशनच्या माध्यमातून सुमारे ४२०० चौ़मी़ क्षेत्रफळाचे तळ मजला व ६ मजले इमारत ताब्यात येत आहे. त्यानुसार पालिकेने येथे सी.एस.आर.च्या माध्यमातून पंचशील फाऊंडेशनच्यावतीने कोविड केअर हॉस्पिटल उभारण्याचे नियोजन केले आहे.     सदर हॉस्पिटलमध्ये प्रारंभी १०० बेड कार्यान्वित करण्यात येत असून, येथील ऑक्सिजन बेड, आयसीयू बेडसह केटरींग सर्व्हिसेस, फार्मसी सर्व्हिसेस आदी कामे व मेडिकल व पॅरामेडिकल स्टाफ पुरविण्याचे काम भाकरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांना कोविड-१९ आजाराचा प्रादुर्भाव असेपर्यंत देण्यास आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाTaxकरcorona virusकोरोना वायरस बातम्या