शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

बारामतीत होणार ४०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यातुन ‘फेस डिटेक्शन’  गुन्हेगारांवर पाळत ठेवणे होणार शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 7:14 PM

गुन्हेगारांवर नजर ठेवणे होणार शक्य..

ठळक मुद्देबारामती एमआयडीसीत 25 हजारांपेक्षा जास्त कामगार करतात काम

बारामती : बारामती शहरासाठी जवळपास ४०० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे प्रस्तावित आहे. 'फेस डिटेक्शन' ची सुविधा या नवीन प्रणाली मध्ये आहे .या प्रणालीमुळे गुन्हेगारांवर पाळत ठेवणे शक्य होणार असल्याचे अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते यांनी उद्योजकांशी बोलताना सांगितले. 

आधुनिक तंत्रज्ञानाची सीसीटीव्ही कॅमेरे एमआयडीसी मध्ये बसवल्यास गुन्हेगारांवर पाळत ठेवून जेरबंद करणे शक्य होणार आहे, उद्योगांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी यावेळी व्यक्त केली. 

बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे अध्यक्ष धनंजय जामदार सचिव अनंत अवचट खजिनदार राधेश्याम सोनार सदस्य शेख वकील, महादेव गायकवाड, हरिभाऊ थोपटे, संभाजी माने, हरीश कुंभारकर, नितीन जामदार, परवेज सय्यद,सुनील वैद्य आदी पदाधिकारी व ऊद्योजकांनी आज मिलिंद मोहिते यांची सदिच्छाभेट घेतली .

यावेळी ते बोलताना पुढे म्हणाले,आधुनिक तंत्रज्ञानाची सीसीटीव्ही कॅमेरे एमआयडीसी मध्ये बसवल्यास गुन्हेगारांवर पाळत ठेवून जेरबंद करणे शक्य होणार आहे, उद्योगांनी यासाठी पुढाकार घ्यावा.बारामती एमआयडीसीमध्ये राज्यातील इतर औद्योगिक वसाहतींच्या तुलनेत  कायदा सुव्यवस्था उत्तम आहे.येथे  अधुन मधुन डोके वर काढणाऱ्या  गैरप्रकारांना उद्योगांच्या सहकार्याने  आळा घातला जाईल, अशी ग्वाही अप्पर पोलीस अधीक्षक मोहिते यांनी दिली.असोसिएशनचे अध्यक्ष जामदार म्हणाले, लॉक डाऊन मुळे उद्योग क्षेत्र अगोदरच प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहे.त्यातच आता भुरट्या चोरां मुळे उद्योजकांना आर्थिक व मानसिक फटका निष्कारण सहन करावा लागत आहे.पोलिसांनी यातील गुन्हेगारांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी तसेच तक्रारदार उद्योजक व कामगारांना नाहक त्रास होऊ देऊ नये. अशा त्रासामुळे उद्योजक तक्रार करण्यास धजावत नाहीत , गुन्हेगारांना मोकळे रान मिळते.बारामती एमआयडीसीमध्ये २५ हजारांपेक्षा अधिक कामगार काम करतात. त्यात परप्रांतीय व महिला कामगारांचे प्रमाण लक्षणीय आहे. एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलिस अधिकारी नेमावा, पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढवावी ,अशी मागणी जामदार यांनी यावेळी केली.दरम्यान बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन च्या वतीने भुरट्या चोरींच्या संदर्भात बारामती ग्रामीण पोलिस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.———————————

टॅग्स :BaramatiबारामतीMIDCएमआयडीसीcctvसीसीटीव्हीPoliceपोलिस