Pune Corona Update: गुरुवारी शहरात ४ हजार १३६ कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 18:53 IST2022-01-27T18:52:44+5:302022-01-27T18:53:02+5:30
शहरात अजूनही दररोज ३ ते ५ हजारांच्या आसपास कोरोनाबाधित आढळून येत आहेत

Pune Corona Update: गुरुवारी शहरात ४ हजार १३६ कोरोना पॉझिटिव्ह
पुणे : शहरात अजूनही दररोज ३ ते ५ हजारांच्या आसपास कोरोनाबाधित आढळून येत आहेत. गुरुवारी शहरात १२ हजार ८१६ चाचण्या पार पडल्या. त्यापैकी ४ हजार १३६ रुग्ण कोरोनाबधित असल्याचे निदान झाले. त्यामुळे पॉझिटिव्हीटी रेट ३२.२७ टक्के झाला आहे.
शहरातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ४१ हजार १७३ इतकी झाली असून, यापैकी केवळ ३.४७ टक्के बाधित हे रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित सर्व रूग्ण गृह विलगीकरणात आहेत. गुरुवारी ७ हजार ४१० जण कोरोनामुक्त झाले असून, दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण पुण्याबाहेरील आहेत. सध्या विविध रूग्णालयात ४१ रूग्ण इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटरवर, ३८ जण नॉन इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटरवर तर ३६८ रूग्णांवर ऑक्सिजन सह उपचार सुरू आहेत.
शहरात आत्तापर्यंत ४२ लाख ९३ हजार ६३० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ६ लाख २४ हजार ८८४ जण कोरोनाबाधित आढळून आले. यातील ५ लाख ७४ हजार २९७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ हजार २१४ जण दगावले आहेत.