शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

बारामतीत विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांमध्ये ४ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 3:26 PM

बारामती पोलिसांनी लढवली शक्कल, विनाकारण फिरणाऱ्यांची केली अँटीजन तपासणी

ठळक मुद्देविनाकारण  फिरणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी पोलिस यंत्रणेने लढविलेली अनोखी शक्कल ठरला कौतुकाचा विषय

बारामती: बारामतीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तरी देखील रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीये. शेवटी पोलीस प्रशासनाने शक्कल लढवत विनाकारण फिरणाऱ्यांचीच अँटीजन टेस्ट सुरु केली आहे.  सुरवातीच्या केलेल्या ८ नागरीकांच्या तपासणीत ४ जण पॉझिटीव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात कडक लॉकडाऊनचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी बारामतीत सुरु करण्यात आली आहे. आता या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी पोलिस यंत्रणेने लढविलेली अनोखी शक्कल कौतुकाचा विषय ठरला आहे. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरीकांची आरोग्य प्रशासनाच्या मदतीने अँटीजन तपासणी सुरु आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठीही मदत होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र तपासणी व्हॅन आणि आरोग्य पथक नेमण्यात आले आहे.

काल दिवसभरात बारामतीत एकूण ३९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये शहरात १९५, ग्रामीण भागात १९६ रुग्णांचा समावेश असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी सांगितले.  आजपर्यंत बारामतीत एकूण रूग्णसंख्येने आता १५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर ११३४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या