वाहन चोरट्यांकडून ४ दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:14 IST2021-02-05T05:14:25+5:302021-02-05T05:14:25+5:30
पुणे : शहर तसेच परिसरातून दुचाकी आणि मोटारी चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पर्वती पायथा भागात पकडले. चोरट्याकडून एक मोटारीसह चार ...

वाहन चोरट्यांकडून ४ दुचाकी जप्त
पुणे : शहर तसेच परिसरातून दुचाकी आणि मोटारी चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पर्वती पायथा भागात पकडले. चोरट्याकडून एक मोटारीसह चार दुचाकी जप्त करण्यात आल्या.
राजू मधुकर पवार (वय १९), महमद अन्वर शेख (वय १९, दोघे रा. ढोक बाभुळगाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चोरट्यांनी म्हात्रे पुल परिसरातून दोघांनी दुचाकी चोरली होती. या गुन्ह्याचा दत्तवाडी पोलीस तपास करीत होते. पर्वती पायथा परिसरात पवार आणि त्याचा साथीदार शेख थांबल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांबाबत चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत त्यांनी भारती विद्याापीठ परिसरातून एक मोटार, खेड शिवापूर परिसरातील वेळू, पिंपरीतील थेरगाव परिसरातून दुचाकी चोरल्याची माहिती दिली.
बनावट चावीचा वापर करून दोघांनी वाहने चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कृष्णा इंदलकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, राजू जाधव, नरेश बलसाने, महेश गाढवे यांनी ही कारवाई केली.