चोरट्यांकडून ३९ मोबाईल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:13 IST2021-02-05T05:13:57+5:302021-02-05T05:13:57+5:30
पुणे : वानवडी पोलिसांनी तिघा चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून ३ लाख २८ हजार रुपयांचे ३९ मोबाईल हस्तगत केले आहेत. अंकुश ...

चोरट्यांकडून ३९ मोबाईल हस्तगत
पुणे : वानवडी पोलिसांनी तिघा चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून ३ लाख २८ हजार रुपयांचे ३९ मोबाईल हस्तगत केले आहेत. अंकुश विठ्ठल कांबळे (वय १९, रा. वैदवाडी, हडपसर), आकाश बाळासाहेब बगाडे (वय २४, रा. रामटेकडी, हडपसर) आणि प्रशांत बाळू सूर्यवंशी (वय २२, रा. वैदवाडी, हडपसर) अशी अटक केेलेल्यांची नावे आहेत.
पोलीस शिपाई नवनाथ खताळ व सुधीर सोनवणे यांना मोबाईल चोरटा रामटेकडी स्मशानभूमीजवळील मठात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे, हवालदार राजू रासगे, अतुल गायकवाड, संभाजी देविकर, योगेश गायकवाड, महेश कांबळे, नासीर देशमुख यांनी अंकुश कांबळे याला पकडले. त्याच्याकडे चौकशी करता त्याने चोरीचे काही मोबाईल आकाश बगाडे याला विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. त्यावरुन बगाडे याला अटक करण्यात आली. त्याने त्याच्याकडील काही मोबाईल प्रशांत सूर्यवंशी याला विक्री केल्याचे तपासात निष्पन झाले. वानवडी व पुणे शहरात त्यांनी मोबाईल चोरी केली असून त्यांच्याकडून ३९ मोबाईल जप्त केले आहेत. लोणी काळभोर व हडपसर परिसरातील प्रत्येकी १ चोरीच्या २ दुचाकी व गुन्ह्यात वापरलेली एक अशा ३ दुचाकी जप्त केल्या आहेत.
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
.........
फोटो