राज्यातील ३७७ एमपीएससी पात्रताधारक अजून बेरोजगारच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 01:28 AM2018-09-08T01:28:29+5:302018-09-08T01:29:00+5:30

राज्यसेवा परीक्षेचा निकाल लागून ३७७ उमेदवारांची विविध पदांवर निवड झाली. मात्र समांतर आरक्षणाबाबत न्यायालयात साखल केलेल्या याचिकेमुळे त्यांना सेवेत रूजू करून घेऊन प्रशिक्षणाला पाठविण्यास स्थगिती देण्यात आली आहे.

 377 MPSC students in the state are yet to be unemployed | राज्यातील ३७७ एमपीएससी पात्रताधारक अजून बेरोजगारच

राज्यातील ३७७ एमपीएससी पात्रताधारक अजून बेरोजगारच

Next

- दीपक जाधव

पुणे : राज्यसेवा परीक्षेचा निकाल लागून ३७७ उमेदवारांची विविध पदांवर निवड झाली. मात्र समांतर आरक्षणाबाबत न्यायालयात साखल केलेल्या याचिकेमुळे त्यांना सेवेत रूजू करून घेऊन प्रशिक्षणाला पाठविण्यास स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे प्रशिक्षणाचे वेळापत्रकच कोलमडले आहे.
राज्यसेवा परीक्षा २०१७ ची मुख्य परीक्षा सप्टेंबर २०१७ मध्ये घेण्यात आली होती. अंतिम निकाल मे २०१८ मध्ये जाहीर झाला. यात १७ उमेदवारांचा निकाल, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेच्या अधीन राहून देण्यात आला आहे. आता अचानक सर्व ३७७ उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठविणे स्थगित केले आहे.

Web Title:  377 MPSC students in the state are yet to be unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.