शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या मावळ तालुक्यात ४५ नागरिकांना जेवणातून विषबाधा; काहींची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 15:59 IST

पाण्याची टाकी साफ न केल्याने विषबाधा झाल्याचे समोर आले आहे

पवनानगर : मावळ तालुक्यातील भडवली गावात गुरुवार (दि.१८) रोजी काकडा आरती समाप्तीचा काल्याचा सार्वजनिक कार्यक्रम झाला. त्यात ग्रामस्थांसाठी जेवनाची सोय करण्यात आली होती. त्यातून ३५  ते ४५ नागरीकांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील पवन मावळ परिसरातील भडवली गावात हा प्रकार घडला असून बाधित रुग्णांना ग्रामीण रुग्णालय काले पवनानगर येथे तातडीच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सार्वजनिक कार्यक्रमातून विष बाधा झाली आहे. त्यामध्ये काही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तर काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

यामध्ये ६ ते ७ लहान मुलांचा समावेश आहे. रुग्णालयातील तीनही वार्ड फुल झाले असुन काही रुग्णांना ग्रामीण रुग्णालय कान्हेफाटा येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तर काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. वैद्यकीय अधिक्षक डॉ इंद्रनिल पाटील य‍ांच्या मार्गदर्शनाखाली डॉ वर्षा पाटील,डॉ. विश्वंभर सोनवणे, डॉ पोपट आधाते, डॉ शिवराज वाघमारे रुग्णांचे उपचार करत आहे.या ठिकाणी लोणावळा ग्रामीणचे पोलिस व वडगाव मावळचे पोलिस अधिकारी उपस्थित होते.

''सकाळी अचानक आम्हाला भडवली गावातून फोन आला की, अन्नातून नागरिकांना विष बाधा झाली आहे. त्यांना उपचारासाठी अब्युलन्सद्वारे रुग्णालयात आणून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना जुलाब, उलट्या, पोटदुखणे, चक्कर येणे, मळमळ होणे अशा प्रकारची लक्षणे दिसुन आली आहेत. साधारणतः रुग्णालयात २८ ते ३० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये ५ ते ६ पेशंटची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना औंध हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तसेच रुग्णालयातील सर्व बेड फुल झाले आहेत. त्यामुळे काही रुग्णांना ग्रामीण रुग्णलाय कान्हे फाटा येथे पाठवण्यात आले आहे डॉ. वर्षा पाटील यांनी सांगितले आहे.''

खराब पाण्यामुळे विषबाधा झाली

लाँकडाऊन पासून बंद असलेल्या टाकीमध्ये स्वच्छ न करता तसेच पाणी भरल्याने विषबाधा झाली आहे. मंदिराजवळ असलेल्या अंगणवाडी शाळेच्या पिण्याच्या पाण्याची टाकी लाँकडाऊन पासून ग्रामपंचायत ने स्वच्छ केली नाही. त्यामधील खराब पाणी बाहेर न काढता काल त्याच टाकीमध्ये ग्रामपंचायतीने पाणी सोडले.  पाणी स्वयंपाक करण्यासाठी घेतले. त्यामुळे खराब पाण्यामुळे विषबाधा झाली आहे.

टॅग्स :mavalमावळPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरTempleमंदिर