शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात डंपरचालकांनी नऊ महिन्यांत घेतले ३३ जणांचे जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 12:34 IST

जड अवजड वाहनांच्या बेशिस्तीमुळे मागील नऊ महिन्यांत तब्बल ३३ जणांना आपले प्राण गमवावे लागले...

ठळक मुद्दे ५ लाख ७० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल

पुणे :  जड अवजड वाहनांच्या बेशिस्तीमुळे मागील नऊ महिन्यांत तब्बल ३३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. विशेष म्हणजे यात सर्वाधिक जीव डंपरने घेतले आहेत, अशा वाहनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील मध्य भागाच्या तुलनेत उपनगरात जड वाहतुकीचे प्रमाण जास्त असून शहराबाहेरून येणारे ट्रक तसेच डंपर जात असल्याने त्या डंपरचालकांच्या बेपर्वाईमुळे अपघात घडले आहेत. विमाननगर भाग तसेच पुणे-नगर रस्त्यावर जड वाहनांना सकाळी नऊ ते रात्री दहा या वेळेत वाहनांना बंदी घालण्यात आली असून, पोलिसांनी प्रवेशबंदीचे आदेश दिल्यानंतर दिवसा या भागातून वाहतूक करणाऱ्या डंपरचालकांवर विमानतळ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी आणि त्यांच्या पथकाने नुकतीच कारवाई केली. प्रवेशबंदीची वेळ झुगारून या भागातून जाणाऱ्या आठ डंपरचालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५ लाख ७० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे (नियोजन)  यांनी सांगितले. शहरातील गंभीर स्वरूपाच्या अपघातांची संख्या कमी झाली आहे. उपनगरात डंपर, ट्रक अशा जड वाहनांमुळे अपघात झाले असल्याचे निरीक्षण पोलीस निरीक्षक शितोळे यांनी नोंदविले. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी दिलेले प्रवेशबंदीचे आदेश झुगारून वाहतूक करणाऱ्या  डंपर आणि ट्रकचालकांवर वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई सुरू  आहे.  ...............बेशिस्तपणे ट्रक आणि डंपर अशी वाहने चालविणाऱ्या चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. वेगावर नियंत्रण ठेवावे. वेगाची मर्यादा ओलांडल्यानंतर अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करू नये. जास्त क्षमतेचा माल वाहून नेल्यास अपघात होण्याची शक्यता असते. प्रवेशबंदीबाबत पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. नियमभंग करणाºया जड वाहनांवर कारवाई सुरूच राहणार आहे.- शुभदा शितोळे, वाहतूक विभाग, पोलीस निरीक्षक (नियोजन).......

जड वाहनांमुळे झालेले प्राणांतिक अपघातट्रक           २१डंपर          १२(आकडेवारी सप्टेंबर अखेरपर्यंतची)

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यू