शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ३२ हजार घरांना मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 21:03 IST

प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक ४ नुसार भोर व वेल्हा तालुक्यात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास (बीएलसी घटकांतर्गत) २.५ लाखापर्यंत २ हजार ४३६ लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणार आहे.

ठळक मुद्देपीएमआरडीएच्या प्रस्तावांना केंद्राकडून मान्यता, आणखी ३० हजार प्रस्तावित  

पुणे: केंद्र शासनातर्फे केंद्रीय संनियंत्रण व मान्यता समितीच्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या ३२ हजार ६२७ परवडणा-या घरांना मंजूरी देण्यात आली. त्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत आणखी ३० हजार १९१ सदनिका प्रस्तावित असून त्यातील २० हजार २०६ सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधणार आहेत. महाराष्ट्रात राज्यातील परवडणा-या घरांसाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक 3 नुसार एमएमआरडीएमार्फत माण-महाळूंगे नगर रचना योजनेतील अत्यल्प उत्पन्न गटातील राखीव भूखंडावर १४ ठिकाणी सुमारे १३.३ हेक्टर क्षेत्रावर परवडणारी घरे बांधली जाणार आहेत. महाराष्ट्र गृह निर्माण विकास महामंडळ (महाहौसिंग)सोबत संयुक्त भागीदारी तत्त्वावर ही घरे बांधण्यास पीएमआरडीएला मान्यता मिळाली आहे.या माध्यमातून अत्यल्प उत्पन्न (ईडब्ल्यूएस)व अल्प उत्पन्न गटासाठी ६ हजार ५०३ परवडणा-या घरांची निर्मिती केली जाणार आहे.या योजनेमुळे माण-महाळुंगे परिसरातील लोकसंख्या १.५ लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे.प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक ४ नुसार भोर व वेल्हा तालुक्यात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास (बीएलसी घटकांतर्गत) २.५ लाखापर्यंत २ हजार ४३६ लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणार आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर खासगी विकासकाकडून घटक ३ नुसार परवडणा-या घरांची निर्मिती करण्यासाठी ६ विकसकांचा सहभाग मिळाला असून २३ हजार ६८८ घरांची निर्मिती केली जाणार आहे. त्यापैकी १३ हजार ७०३ घरांची निर्मिती शासकीय दराने केली जाणार आहे. त्याचप्रमाणे भागीदारीमधील परवडणा-या घटकांतील घरांसाठी २.५ लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. नागरिकांनी www.pZrdÔpZÔy.co या संकेतस्थळावर भेट द्यावी,असे आवाहन पीएमआरडीएतर्फे करण्यात आली आहे.-------------वाघोली, भावडी, मुळशीत घरे हवेली तालुक्यातील भावडी येथे १८० ,आर्थिक दृष्ट्या दूर्बल घटकांसाठी वाघोलीत  425 परवडणा-या सदनिका,मुळशी तालुक्यात ७०३  तर लोणीकंदमध्ये १ हजार २७१,महाळुंगे येथे १० हजार ६१३ परवडणा-या सदनिका केल्या जाणार आहेत.माण-महाळुंगे येथे २ हजार ३८७ घरे निर्माण केली जाणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेHomeघरPMRDAपीएमआरडीए