शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात शाळांची घंटा पुन्हा एकदा वाजली; पहिल्या दिवशी ३२ शाळा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 21:44 IST

गुरुकुल विद्यामंदीर गोखळी शाळेत सर्वाधिक विद्यार्थी उपस्थित 

इंदापूर : कोरोनाच्या कालावधीत मागील दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा, तब्बल दीड वर्षानंतर प्राथमिक स्तरावर चालू करण्यात आले आहेत. शासनाने ठरवून दिलेले कोरोनाचे सर्व नियम पाळून तालुक्यातील एकूण ३२ शाळा चालू करण्यात आले आहेत. अशी माहिती तालुका गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी दिली. 

याबाबत माहिती देताना गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात पहिल्याच दिवशी तब्बल ३२ सुरू झाल्या शाळा सुरू झाल्या असून, आठवी ते बारावीचे वर्ग शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार झाले सुरू झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक गोखळी गावातील, गुरुकुल विद्यामंदिर गोखळी च्या शाळेत पहिल्याच दिवशी ७५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थित आहे. 

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यासदंर्भात शासन निर्णय जारी केला आहे.  त्या शासन निर्णयानुसार आज गुरुवार ( दि. १५  जुलै ) पासून इंदापूर तालुक्यात ग्रामीण भागात तब्बल पहिल्याच दिवशी ३२ शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. 

यामध्ये  सर्व शाळांना कोरोना संबंधी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाने जारी केलेल्या कार्यपद्धतीचं काटेकोरपणाने पालन करून, एका बाकावर एक विद्यार्थी व दोन बाकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवत, शाळा आज व्यवस्थित पणे सुरु झाली आहेत. प्रत्येक शाळेमध्ये सतत साबणाने हात धुन्या ची सुविधा करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच शासनाकडूम जे काही नियम लागू केले आहेत, त्याची पूर्ण दक्षता या ठिकाणी घेतली जात आहे. 

इंदापूर तालुक्यातील गुरुकुल विद्यामंदिर गोखळी शाळेत कोरोनाची पुर्ण खबरदारी घेवून, एका बाकावर एक विद्यार्थी बसवून, दोन बाकांमध्ये एक मीटरचे अंतर ठेवत शाळा नियमीत चालू करण्यात आली आहे. इयत्ता ८ वी ते ११ वी वर्गाचा पट हा ४२५ आहे. त्यातील पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती ३१० म्हणजे एकूण ७५ टक्के विद्यार्थी पहिल्याच दिवशी शाळेत उपस्थित होते. त्यामुळे या शाळेचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे.  

टॅग्स :IndapurइंदापूरSchoolशाळाStudentविद्यार्थीcorona virusकोरोना वायरस बातम्या