शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात डिजिटल सातबाराचा एकाच दिवसात ३१ लाखांचा महसूल जमा; १ लाख सातबारा उतारे डाउनलोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 14:58 IST

डिजिटल सातबाराचा नवा उच्चांक तर लाखांच्या उतारे डाउनलोड झाल्याने नाव विक्रमही झाला

ठळक मुद्देमहसूल विभागाने शेतकऱ्यांना घरबसल्या आॅनलाइन सातबारा उतारा उपलब्ध व्हावा. या उद्देशाने डिजिटल सातबारा उतारा ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुणे: राज्यात एकाच दिवसात एक लाख डिजिटल सातबारा उतारे डाउनलोड झाले असून नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. तर एकाच दिवसात सर्वाधिक सर्वाधिक ३१ लाख ५० हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे. सोमवारी हा नवा उच्चांक नोंदला गेला आहे. 

महसूल विभागाने शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाईन सातबारा उतारा उपलब्ध व्हावा. या उद्देशाने डिजिटल सातबारा उतारा ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुविधांमुळे सामान्य शेतकऱ्यांच्या जमीनविषयक आणि सातबाराबाबतच्या अनेक समस्या दूर झाल्या आहेत. याबरोबरच इतर ऑनलाईन सेवाही विभागाच्या वतीने सुरु करण्यात आल्या आहेत. 

राज्य सरकारने डिजिटल स्वाक्षरीत सातबारा, खाते उतारे आणि मिळकत पत्रिका ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी महाभूमी पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल सध्या सर्वच खातेदारांच्या पसंतीस उतरल्याचे दिसून येत आहे.

सोमवारी झालेली एका दिवसाची नोंद 

ऑनलाइन दस्त नोंदणीची संख्या – ४५३१ऑनलाइन फेरफार संख्या – १२१३२ऑनलाइन निर्गत फेरफारची संख्या – १००६३नोटीस तयार केलेल्या फेरफारची संख्या – ११०१३तलाठी स्तरावरून अभिलेख वितरण प्रणालीतून वितरीत सातबारा व खाते उतारे संख्या- २ लाख ८६ हजार ५८०.पीक कर्जासाठी बँकांनी घेतलेल्या ऑनलाइन सातबारा व खाते उतारे संख्या - १० हजार.पीक विमा योजनेसाठी वापरलेल्या सातबाराची संख्या – १ लाख ३४ हजार.भूलेखवरून मोफत मिळविलेल्या सातबारा - ५ लाख २ हजार.एका दिवसात नक्कल शुल्कद्वारे जमा झालेला महसूल - ३१ लाख ५० हजार रूपये.

''महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रकल्पाला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. यामागे राज्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल अधिकारी यांचे कठोर परिश्रम आहेत. '' असे  ई- फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक व उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले आहे

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGovernmentसरकारonlineऑनलाइन