शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर वाळूउपसा करणारे ३0 ट्रक जप्त

By admin | Updated: June 9, 2015 05:18 IST

दौंड-कुरकुंभ परिसरात बेकायदेशीर वाळूवाहतूक करणारी ३० वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.

दौंड : दौंड-कुरकुंभ परिसरात बेकायदेशीर वाळूवाहतूक करणारी ३० वाहने ताब्यात घेण्यात आली असून, प्रत्येकी ३० हजार रुपये दंडाप्रमाणे दंडापोटी एकूण ९ लाख रुपये महसूल जमा होईल, अशी माहिती तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिली. भविष्यात तालुक्यात बेकायदेशीर वाळूवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाईलच; परंतु वाळूवाहतूक करणारी सर्वच वाहने तपासली जाणार आहेत. दरम्यान, यात अवैध वाळूवाहतूक करणारा सापडल्यास त्याच्यावर कायद्याचा बडगा उगारला जाईल. याकामी महसूल पथक नेमण्यात आले आहे. रविवारी आणि सोमवारी दौंड येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ कुरकुंभ परिसरात बेकायदेशीर वाहने पकडली आहेत. तसेच, पकडलेली वाहने पळून जाऊ नयेत म्हणून या कामी सतर्कता बाळगली आहे. यापूर्वी जप्त केलेली महसूल खात्याच्या ताब्यातील ३ वाहने वाळूमाफियांनी पळवून नेली होती. पैकी १ वाहन गेल्या पंधरवड्यात दौंड पोलिसांनी पकडले, तर दुसरा ट्रक वाळू भरण्यासाठी देऊळगावराजे परिसरातील हद्दीत आल्यावर महसूल खात्याने तो पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. बेकायदेशीर वाळूउपशाला आळा घालणारसध्याच्या परिस्थितीत बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या वाळू माफियांवर महसूल खात्याने नजर ठेवली असून, जो कोणी बेकायदेशीरपणे शासनाचे नियम तोडून वाळूवाहतूक करेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. बेकायदेशीर वाळूउपशाला आळा घालण्यासाठी एक मंडलाधिकारी, सहा तलाठी, सहा कोतवाल असे एक पथक नेमले असून, त्या पथकात दोन पोलिसांनादेखील सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बेकायदेशीर वाळूउपशाला आळा घालण्यासाठी नियोजन केल्याचे तहसीलदार उत्तम दिघे यांनी सांगितले.