शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील 283 शाळा सुरू; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST

पुणे: कोरोनानंतर शहरातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या असून, पहिल्याच दिवशी 786 पैकी 283 शाळांची घंटा वाजली. ...

पुणे: कोरोनानंतर शहरातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या असून, पहिल्याच दिवशी 786 पैकी 283 शाळांची घंटा वाजली. त्यातही सुरू होणा-या शाळांमध्ये खासगी शाळा अधिक असून पेठांमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली असल्याचे दिसून आले. पालिकेने 348 शाळांची तपासणी केली असली,, तरी सर्व शाळा सुरू झाल्या नाहीत. इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळा आठवडा भरात सुरू होणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा जानेवारी महिन्यात सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली. मात्र, पुणे महापालिका प्रशासनाने 1 फेब्रुवारीपासून शहरातील शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. त्यासाठी शासनाने दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे बंधन शाळांना घालण्यात आले. तसेच शिक्षकांची कोरोना तपासणी केल्या शिवाय शाळा सुरू करणे शक्य नसल्याने पालिकेच्या व खासगी शाळांमधील शिक्षक कोरोना तपासणी करून घेत आहेत. शहरातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील उपस्थितीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पाचवी ते आठवीच्या शाळांना विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे.

भावे हायस्कूल, रमणबाग, गरवारे, नूमवि, महेश विद्यालय आदी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली होती. महेश विद्यालायातील नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शाळेत आलेल्या पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छा व खाऊ देऊन स्वागत केले. तब्बल दहा महिन्यांनंतर शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसून आले. शाळांनी सुध्दा सॅनिटायझर, स्वच्छता व फिजिकल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला.

------------------------------------

पालिका हद्दीतील सुरू झालेल्या शाळांची विभागनिहाय आकडेवारी

विभागाचे नाव मनपा शाळा खासगी शाळा.

सिंहगड रस्ता ४ १२

ढोले-पाटील रस्ता १ ६

घोले रस्ता ४ ११

नगर रस्ता ११ १६

भवानी पेठ १३ १

विश्रामबागवाडा ० ११

वारजे-कर्वेनगर ० ३

हडपसर ० १४

कोथरूड २ ८

कात्रज १३ २७

येवलेवाडी ३ २३

बिबवेवाडी १९ २१

औंध २५ २६

वानवडी-रामटेकडी ११ २