शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेडिंगमध्ये नफा मिळवण्याचे आमिष दाखवून महिलेला २८ लाखांचा गंडा

By भाग्यश्री गिलडा | Updated: May 18, 2024 16:29 IST

शेअर ट्रेडिंगमधून फायदा होतोय असा विश्वास बसल्याने महिलेने पैश्यांची गुंतवणूक सुरु ठेवली होती

पुणे : शेअर ट्रेडिंग करून भरपूर पैसे कमावण्याच्या नादात एका महिलेने २८ लाख रुपये गमावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी (दि. १७) स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट परिसरात राहणाऱ्या एका ४४ वर्षीय महिलेने पोलिसांना फिर्याद दिली आहे. हा प्रकार ८ फेब्रुवारी ते १७ मे यादरम्यानच्या काळात घडल्याचे तक्रारदार यांनी सांगितले आहे. सायबर चोरट्याने व्हॉट्सॲपवरून तक्रारदार यांच्याशी संपर्क साधला. शेअर मार्केट ट्रेडिंग, ब्लॉक ट्रेडिंग, आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा आणि परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवले. तक्रारदार यांनी आमिषाला बळी पडून पैसे गुंतवण्यास होकार दिला. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून व्हाॅट्सॲप जॉइन करायला सांगितले. ग्रुप जॉइन केल्यावर ट्रेडिंग करण्यासाठी एक ॲप डाऊनलोड करायला सांगितले. फिर्यादींनी ॲप्लिकेशन डाऊनलोड करून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यांनी एकूण २८ लाख ५१ हजार रुपयांची गुंतवणूक केली. यानंतर त्यांना काही प्रमाणात मोबदला देण्यात आला. शेअर ट्रेडिंगमधून फायदा होत आहे असा विश्वास बसल्याने त्यांनी पैश्यांची गुंतवणूक सुरु ठेवली. काही काळानंतर  मात्र, त्यांना ते पैसे काढता येत नव्हते. त्यांनी सायबर चोरट्यांशी संपर्क केला, तेव्हा वेळोवेळी आणखी पैसे भरायला सांगितले. पैसे मिळणार नाहीत, याची खात्री झाल्यावर महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भापकर करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेshare marketशेअर बाजारfraudधोकेबाजीMONEYपैसाWomenमहिलाPoliceपोलिस