शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ज्वेलरीचे दुकान फोडून २७ हजारांचे दागिने लंपास; त्याच चोरट्यांकडून मोबाईल दुकानातील चोरीचा प्रयत्न असफल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 16:40 IST

सोमवारी पहाटे चारच्या सुमारास ज्वेलरी दुकानाचे शटर उचकटून चोरी केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस

ठळक मुद्देदुकानातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता तिघे दुकानाचे शटर उचकटून चांदी व रोख रक्कम चोरी करीत असल्याचे दिसून आले.

लोणी काळभोर: लोणी काळभोर येथे तिघांनी सोमवारी पहाटे चारच्या सुमारास ज्वेलरी दुकानाचे शटर उचकटून चोरी केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. दुकानातून रोख रक्कमेसह ३६० ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण २७ हजार ५०० रुपये किंमतीचा माल चोरांनी पळून नेला आहे. याप्रकरणी ओम राजेंद्र वर्मा ( वय ३४, रा. त्रिमुर्ती चौक, लोणी काळभोर  ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्मा यांचे लोणी काळभोर गावातील खोकलाई देवी चौकात मालती कॉम्ल्पेक्स मध्ये ओम धनेश ज्वेलर्स हे दुकान आहे. सोमवारी दुपारी ते सोनार कामासाठी पुण्यातील रविवार पेठेत दुुुुकान बंद करुन गेले होते. मंगळवार पहाटे ५ वाजण्याच्या सुमारांस त्यांची चुलती सविता वर्मा या पहाटे वॉकिंगसाठी दुकानासमोरून जात असताना त्यांना शटर हे उचकटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी ओम यांना फोन करून सांगितल्यावर ते तातडीने दुकानाजवळ पोहोचले. त्यावेळी दुकानाचे शटर उचकटलेले दिसल्याने त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता चांदीच्या वस्तू चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. दुकानातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता पहाटे ४ वाजण्याच्या सुमारांस सुमारास तिघे दुकानाचे शटर उचकटून चांदी व रोख रक्कम चोरी करीत असल्याचे दिसून आले. 

त्यानंतर त्यांना त्यांचे मित्र योगेश जवाहरलाल शर्मा (वय २७, रा. नेहरू चौक ) यांचे साई मारवन्स टेलीकॉम नांवाचे मोबाईलचे दुकान फोडले असल्याचे कळाले. त्यावेळी तिघांनी दुकानाचे सेंन्टर लॉक तोडून मोबाईल व इतर रोकड चोरण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ते असफल झाल्याने काहीही चोरीस गेलेले नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर हे करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक