शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

मिळकतकराची २६१ कोटींची थकबाकी

By admin | Updated: June 24, 2015 05:25 IST

शहरातील मिळकतकराची ५० लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची यादी नगरसेवकांनी मुख्य सभेत जाहीर केली.

पुणे : शहरातील मिळकतकराची ५० लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची यादी नगरसेवकांनी मुख्य सभेत जाहीर केली. शहरात असे १७५ थकबाकीदार असून, त्यांच्याकडे एकून २६१ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदारांमध्ये नामांकित बिल्डर, शिक्षण संस्थाचालकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. न्यायालयामध्ये खटले सुरू असल्याने, त्यापैकी अनेकांनी थकबाकी भरलेली नाही.भोगवटा पत्र न घेता, वापर सुरू केलेल्या सदनिकाधारकांना दंड आकारून भोगवटापत्र देण्याची योजना सुरू करण्याच्या प्रस्तावावर महापालिकेच्या मुख्य सभेत चर्चा सुरू होती. त्या वेळी मिळकतकराची थकबाकी असलेल्या बिल्डरांच्या फायद्यासाठी ही योजना आणली जात असल्याचा आरोप करून नगरसेवक राजू पवार यांनी ५० लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची यादी जाहीर केली. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही थकबाकी आहे. किरकोळ थकबाकी असलेल्यांच्या दारासमोर बँडबाजा घेऊन जाणाऱ्या प्रशासनाने या मोठ्या थकबाकीदारांवर वर्षानुवर्षं मेहरनजर दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. या मोठ्या थकबाकीदारांपैकी काहींनी न्यायालयामध्ये धाव घेतल्याने त्यांची प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत. काहीजणांनी विशेष सवलत देण्याची मागणी करून, थकबाकी भरण्याचे टाळले आहे. (प्रतिनिधी)