मिळकतकराची २६१ कोटींची थकबाकी

By Admin | Updated: June 24, 2015 05:25 IST2015-06-24T05:25:16+5:302015-06-24T05:25:16+5:30

शहरातील मिळकतकराची ५० लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची यादी नगरसेवकांनी मुख्य सभेत जाहीर केली.

261 crore of income tax outstanding | मिळकतकराची २६१ कोटींची थकबाकी

मिळकतकराची २६१ कोटींची थकबाकी

पुणे : शहरातील मिळकतकराची ५० लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची यादी नगरसेवकांनी मुख्य सभेत जाहीर केली. शहरात असे १७५ थकबाकीदार असून, त्यांच्याकडे एकून २६१ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदारांमध्ये नामांकित बिल्डर, शिक्षण संस्थाचालकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. न्यायालयामध्ये खटले सुरू असल्याने, त्यापैकी अनेकांनी थकबाकी भरलेली नाही.
भोगवटा पत्र न घेता, वापर सुरू केलेल्या सदनिकाधारकांना दंड आकारून भोगवटापत्र देण्याची योजना सुरू करण्याच्या प्रस्तावावर महापालिकेच्या मुख्य सभेत चर्चा सुरू होती. त्या वेळी मिळकतकराची थकबाकी असलेल्या बिल्डरांच्या फायद्यासाठी ही योजना आणली जात असल्याचा आरोप करून नगरसेवक राजू पवार यांनी ५० लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची यादी जाहीर केली. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही थकबाकी आहे.
किरकोळ थकबाकी असलेल्यांच्या दारासमोर बँडबाजा घेऊन जाणाऱ्या प्रशासनाने या मोठ्या थकबाकीदारांवर वर्षानुवर्षं मेहरनजर दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. या मोठ्या थकबाकीदारांपैकी काहींनी न्यायालयामध्ये धाव घेतल्याने त्यांची प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत. काहीजणांनी विशेष सवलत देण्याची मागणी करून, थकबाकी भरण्याचे टाळले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 261 crore of income tax outstanding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.