शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चोरट्यांकडून १९ लाखांच्या २५ दुचाकी जप्त; हडपसर पोलिसांची कामगिरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 11:48 IST

दोघांकडे केलेल्या चौकशीत १० महागड्या दुचाकी, गावठी कट्टा असा १० लाख ७० हजारांचा माल जप्त

पुणे : हडपसरपोलिसांच्या तपास पथकाने दोन वेगवेगळ्या कारवायात चोरीच्या तब्बल १८ लाख ९० हजार रुपयांच्या २५ महागड्या दुचाकी जप्त केल्या आहेत. 

कार्तिक प्रकाश भुजबळ, योगेश नवनाथ वजाळे (दोघे रा़ लोणी काळभोर), अभिषेक अनिल भंडगे (रा़ गाडीतळ, हडपसर), निलेश मधुकर आरते (रा़ तुकाई दर्शन, हडपसर), संजय हरीष भोसले (रा़ शेवाळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरते व भोसले यांच्या ताब्यातून १ गावठी पिस्तुल व काडतुसे जप्त केली. 

सहायक निरीक्षक संजय चव्हाण यांचे पथक शनिवारी रात्री गस्त घालत असताना दुचाकीवरुन जाणारे निलेश व संजय हे पोलिसांना पाहून घाबरुन दुचाकी सोडून पळाले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले. दोघांकडे केलेल्या चौकशीत १० महागड्या दुचाकी, गावठी कट्टा असा १० लाख ७० हजारांचा माल जप्त करण्यात आला.

पोलीस नाईक नितीन मुंढे, हवालदार प्रताप गायकवाड, शशिकांत नाळे हे शनिवारी दुपारी शेवाळवाडी फाटा येथे वाहनांची तपासणी करीत असताना दुचाकीवरुन तिघे जण जात होते. थांबण्याचा इशारा केल्यानंतरही ते पळून जाऊ लागल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कार्तिक, योगेश, अभिषेक या तिघांकडे केलेल्या चौकशीत ८ लाख २० हजार रुपयांच्या १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चव्हाण, उपनिरीक्षक माने, अंमलदार प्रदीप सोनवणे, सैदोबा भोजराव, अकबर शेख, शाहिद शेख, प्रशांत दुधाळ यांच्या पथकाने केली.

टॅग्स :HadapsarहडपसरThiefचोरtheftचोरीPoliceपोलिसArrestअटक