शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

राज्यातील २४ जिल्हे पाऊस नसल्याने कोरडेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 06:43 IST

पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेल्यानंतरही कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्हे व नाशिक वगळता राज्यातील तब्बल २४ जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झालेला आहे़

पुणे : पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेल्यानंतरही कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्हे व नाशिक वगळता राज्यातील तब्बल २४ जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झालेला आहे़ मराठवाड्यात सरासरीपेक्षा ३१ टक्के, तर विदर्भात ३० टक्के कमी पाऊस झाला आहे़पावसाअभावी या जिल्ह्यांतील पेरण्या खोळंबल्या आहेत. राज्यात सध्या कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील भागात पाऊस आहे़ मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस आहे़ मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असली, तरी अहमदनगर (८ टक्के), पुणे (७५ टक्के), सातारा (२१ टक्के), कोल्हापूर (२६ टक्के) या जिल्ह्यांत जादा पावसाची नोंद झाली आहे़ सोलापूर (-५० टक्के), सांगली (-१५ टक्के) येथे पावसाची मोठी तूट आहे. उत्तर महाराष्ट्रात केवळ नाशिक जिल्ह्यात २१ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असून, नंदुरबार (- ३६ टक्के), जळगाव (-१७ टक्के), धुळे (-१६ टक्के) जिल्हे कोरडेच आहेत.>पावसास सध्या अनुकूल स्थिती नाहीपश्चिम बंगालच्या उपसागरात सध्या पावसाच्या दृष्टीने अनुकूल स्थिती नसल्याने मराठवाडा व विदर्भात सध्या मोठ्या पावसाच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती नाही़ त्यामुळे मराठवाडा व विदर्भातील खरीप पेरण्योंवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे़>मराठवाड्यात३१ टक्के कमी पाऊसमराठवाड्यात १ जून ते १४ जुलैअखेर सरासरीपेक्षा तब्बल ३१ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे़ हिंगोली (- ४६ टक्के) व नांदेड (- ४५ टक्के) जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी पाऊस झाला असून, बीड (-३७ टक्के), परभणी (-३४ टक्के), उस्मानाबाद (-२६ टक्के), लातूर (-३२ टक्के), जालना (-१७ टक्के), औरंगाबाद (-८ टक्के) येथेही सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे़विदर्भात ३० टक्के कमीसंपूर्ण विदर्भात सरासरीच्या ३० टक्के कमी पाऊस झाला़ यवतमाळ (-५१ टक्के), वर्धा (-४३ टक्के), वाशिम (-४१ टक्के), अमरावती (- ३९ टक्के), भंडारा (- ३१ टक्के), अकोला (- २८ टक्के), चंद्रपूर (-२३ टक्के), गोंदिया (-३७ टक्के), नागपूर (-२६ टक्के), गडचिरोली (- २० टक्के) जिल्ह्यांमध्ये पावसाची नितांत गरज आहे़ केवळ बुलडाणा (-३ टक्के) जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस झाला आहे़

टॅग्स :Damधरण