शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महिन्यात २२ जणांचा अपघातात बळी, आता तरी विचार करा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 15:23 IST

जानेवारी महिन्यात  पुणे शहरात २० प्राणघातक अपघात झाले असून त्यात २२ जणांना आपला जीव गमवावा.

ठळक मुद्देअपघात रोखणे सर्वांची जबाबदारी 

पुणे : सुमारे ९०० सीसीची बाईक, प्रचंड वेग, विनाहेल्मेट, अवघे २४ वय वर्षे आणि मध्य वस्तीतील भरदुपारी रस्ता मोकळा असताना झालेला भीषण अपघात़ या अपघाताचा व्हिडीओ लोकांच्या अंगावर काटा आणणारा ठरला. त्यामुळे भारी भारी गाड्या आणि वेगाने जाणाऱ्या बाईकस्वारांचा आताच सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता असल्याचा विचार बळावू लागला आहे. पोलीस आयुक्त डॉ़. के. व्यंकटेशम यांनी पुणेपोलिसांच्या ट्विटरवर हा मेसेज टाकला व सर्वांना प्रश्न विचारला, की हे उपनगरात नाही तर मध्य वस्तीत घडले आहे. आता त्याचा विचार करणार नाही तर कधी? त्याला हजारोंनी प्रतिसाद दिला आहे. रविवारी दुपारी बारा वाजता टिळक रोडवरील साहित्य परिषदेच्या पुढे काही अंतरावर हा अपघात झाला. तेथील एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये या अंगावर शहारे आणणारी अपघाताची दृश्ये कैद झाली होती. तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. जवळपास २५ हजार लोकांनी याला प्रतिसाद दिला असून अनेकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. त्यातूनच यातील गांभीर्य समोर येऊ लागले आहे.  आकाश विधाते २४ वर्षांचा तरुण स्पोर्ट्स बाईकवर अलका चित्रपटगृहाकडून टिळक रोडने अतिशय वेगाने जात होता. दुपारची वेळ व न्यूझीलंड-भारत यांच्यातील टी-२० सामना असल्याने रस्त्यावर जवळपास गर्दी नव्हती़. त्यामुळे तो अतिशय वेगाने स्वारगेटकडे जात होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  त्याने साहित्य परिषद येथील सिग्नलही तोडून तो पुढे गेला होता. त्याचवेळी लिमयेवाडी येथील बोळातून रिक्षा टिळक रोडवर आली. तिला कोथरूडकडे जायचे असल्याने ती अलका टॉकीजकडे जाऊ लागली. तिने जवळपास अर्धा रस्ता ओलांडला असताना आकाश वेगाने आला. रिक्षा पाहून त्याला आपल्या बाईकचा वेग आवरता आला नाही. त्याने रिक्षाला धडक दिली़. पण बाईकचा वेग इतका होता, की तो रस्त्याच्या दुसºया बाजूला वेगाने घसरत गेला. त्याचवेळी स्वारगेटहून एक पीएमपी बस येत होती. कोणाला काही समजायच्या आत तो बाईकसह बसच्या खाली गेला. हा अपघात पाहून लोक धावून आले. परंतु, आकाशला कोणी वाचवू शकले नाही. ट्विटरवर प्रतिक्रिया देताना रुतुल थोरात याने सांगितले, की पोलिसांनी दंड केल्यावर मी हेल्मेट वापरायला सुरुवात केली़.आता मला सुरक्षित वाटत आहे.अशाच प्रकारे अनेकांनी याची गंभीर दखलही घेतली आहे़......अपघात रोखणे सर्वांची जबाबदारी याबाबत पोलीस आयुक्त डॉ़. के. व्यंकटेशम यांनी सांगितले, की टिळक रोडवरील अपघात पाहिल्यानंतर तरी आपण आता विचार करणार नाही तर कधी करणाऱ? जानेवारी महिन्यात  पुणे शहरात २० प्राणघातक अपघात झाले असून त्यात २२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्राणघातक अपघात रोखण्याची ही सर्वांची जबाबदारी आहे......शहरात तसेच उपनगरात वेगाने जाणाऱ्या बाईकस्वारांमध्ये तरुणांची संख्या असते. अचानक काही तरी होते आणि मग एक कुटुंब आता तोंडाशी आलेल्या तरुणाला गमावते. तो कोणाचा भाऊ असतो, कोणाचा एकुलता तर कोणाचा पती़ काहींच्या खांद्यावर तर अख्ख्या कुटुंबाचा आधार असतात. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू