शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

पुणे जिल्ह्यात २१४ संवेदनशील तर ४ असुरक्षित मतदान केंद्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 1:15 PM

जिल्हा प्रशासनाने निवडणूकीची आवश्यक असलेली तयारी पूर्ण केली असून संवेदनशील केंद्रांवरील मतदान शांततेत पार पडावे याबाबतची खबरदारी घेतली गेली आहे...

ठळक मुद्दे एक हजार मतदान केंद्रांचे केले जाणार वेबकास्टिंग

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे संवेदनशील व असुरक्षित मतदान केंद्रांची यादी तयार केली आहे. जिल्ह्यात एकूण २१४ संवेदनशील तर ४ असुरक्षित मतदान केंद्र आहेत. त्यात पुणे लोकसभा मतदार संघात सर्वाधिक ९१ संवेदनशील मतदान केंद्र आहेत. मात्र, जिल्ह्यातील सुमारे १ हजार मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग केले जाणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट केले.जिल्ह्यातील सर्व निवडणूकांदरम्यान कायदा सुव्यवस्था राखली जावी. तसेच निवडणुका शांततापूर्ण वातावरणात पार पडाव्यात; या उद्देशाने जिल्ह्यातील संवेदनशील व असुरक्षित मतदान केंद्रांकडे जिल्हा प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. संवेदनशील व असुरक्षित केंद्रांवर ‘सुक्ष्म निरीक्षक’आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने पाठविलेल्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्याचप्रमाणे या मतदान केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान तैनात केले जाणार आहेत.पुणे जिल्ह्यातील पुणे लोकसभा मतदार संघात येणाºया पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विधानसभा मतदार संघात सर्वाधिक २१ मतदान केंद्र संवेदशील आहे. तर वडगावशेरी मतदार संघात १६ आणि कसबा पेठ आणि शिवाजीनगरमध्ये प्रत्येकी १४ आणि कोथरूडमध्ये ९ मतदान केंद्र संवेदनशील आहेत.बारामती मतदारसंघात एकूण ६३ मतदान केंद्र संवेदनशील असून इंदापूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक १९ संवेदनशील मतदान केंद्र आहेत.तर खडकवासला मतदार संघात १३, बारामती व दौंडमध्ये प्रत्येकी ९ आणि भोरमध्ये ८ तर पुरंदरमध्ये ५ संवेदनशील केंद्र आहेत, असे जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांनी सांगितले.---- जिल्हा प्रशासनाने निवडणूकीची आवश्यक असलेली तयारी पूर्ण केली असून संवेदनशील केंद्रांवरील मतदान शांततेत पार पडावे याबाबतची खबरदारी घेतली गेली आहे. जिल्ह्यातील तब्बल १ हजार मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग केले जाणार आहे. त्यात संवेदनशील मतदान केंद्रांचाही समावेश आहे. त्यामुळे कोणत्या मतदान केंद्रांवर कोण येत आहे, कुठे बुबार मतदान होत आहे, कोणत्या केंद्रांवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकते. तसेच निवडणूक अधिकारी योग्य पध्दतीने काम करतात किंवा नाही, याबाबतची माहिती वेबकास्टिंगमुळे तात्काळ समजू शक णार आहे. - नवल किशोर राम, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे 

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcollectorजिल्हाधिकारीVotingमतदान