शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही सोबत नसतो तर काँग्रेसनं इतक्या जागा जिंकल्या असत्या का?; संजय राऊतांचा प्रश्न
2
"नाना पटोलेंनी कठीण काळात काँग्रेसला राज्यात उभं केलं हे कुणीही विसरू शकणार नाही"
3
"थोडं थांबा, मोदींच्या शपथविधीनंतर ..."; राजीनाम्याच्या तयारीतील फडणवीसांना अमित शाह यांनी काय सांगितलं?
4
"महाराष्ट्र काँग्रेस विचाराचं राज्य; लोकसभेची लढाई जिंकली आता लक्ष्य विधानसभा"
5
विधानसभा मनसे स्वबळावर लढणार?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नेते म्हणाले...
6
हुथी बंडखोरांची मुजोरी! सागरी हल्ल्यानंतर आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या ९ कर्मचाऱ्यांना बनवले बंदी
7
मोठी बातमी: महाराष्ट्रात हादरा, दिल्लीत बैठक; शिंदे-फडणवीस-अजितदादांमध्ये खलबतं सुरू
8
शरद पवारांच्या पक्षातील ३ आमदार आमच्यासोबत येणार; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा
9
शेअर बाजार घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी 'त्या' दिवशी बक्कळ कमाई केली; पाहा...
10
मोदींसोबत वाजपेयींसारखा गेम करू शकतात चंद्राबाबू नायडू?; भाजपा उचलतंय सावध पाऊल
11
ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..."
12
अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; ईडीने परत केली १८० कोटींची संपत्ती
13
शेअर मार्केटने मोडला 3 जूनचा रेकॉर्ड; सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाढ, Sensex 76000 पार...
14
जितते कम है, हारते जादा...! पाकिस्तानच्या पराभवानंतर बिचाऱ्या या तरुणीची व्यथा ऐका, Video 
15
लोकसभेतल्या विजयानंतर शिंदेंच्या मतदारसंघावर राणेंचा दावा; उदय सामंत म्हणाले, "फडणवीसांकडे..."
16
याला म्हणतात 'खटा-खट खटा-खट रिटर्न'! 4 वर्षांत ₹1 लाखाचे झाले ₹47 लाख; दिला 4500% चा बंपर परतावा
17
NDA च्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी घेतले लालकृष्ण अडवाणींचे आशीर्वाद
18
NDA नं राष्ट्रपतींकडे केला सरकार बनवण्यासाठी दावा; तिसऱ्यांदा PM बनणार नरेंद्र मोदी
19
नरेंद्र मोदींचा शपथविधी ९ जूनलाच का?; माजी पंतप्रधानांसोबत आहे कनेक्शन
20
...आणि तू विराट कोहलीशी स्पर्धा करतोस! IShowSpeed ने पाकिस्तानी संघाची पार लाज काढली

एमआयटी शिक्षण संकुलातील २१ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 8:59 PM

मागील दोन दिवसापासून जॉर्डन हा तणावामध्ये होता...

लोणी काळभोर (पुणे) : पूर्व हवेलीतील नामांकित एमआयटी शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलात डिझाईन विभागात चौथ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या बंगलोर येथील एका २१ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना आज गुरुवारी (ता. २०) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

जॉर्डन पब्लिसीयेस (वय २१, मूळ रा. बेंगलोर कर्नाटक) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जॉर्डन पब्लिसीयेस हा विद्यार्थी एमआयटी शैक्षणिक संकुलातील डिझाईन कॉलेजमध्ये चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. मागील दोन दिवसापासून जॉर्डन हा तणावामध्ये होता. दरम्यान, एमआयटीतील सुरक्षा रक्षकांना आज पाच वाजण्याच्या सुमारास जॉर्डनने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.

त्यानंतर सुरक्षारक्षकांनी तत्काळ ही माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, लोणी काळभोर पोलीस व सुरक्षारक्षकांच्या मदतीने जॉर्डनचा मृतदेह खाली उतरविण्यात आला आहे. मात्र जॉर्डन याने आत्महत्या का केली आहे, याचे कारण अद्याप समजू शकलेली नाही.

लोणी काळभोर पोलिसांनी या घटनेची माहिती जॉर्डनच्या आई-वडिलांना दिलेली आहे. जॉर्जिनचे वडील आज बेंगलोर वरून संध्याकाळी दहा वाजता विमानाने पुण्याला येणार आहेत. लोणी काळभोर पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीLoni Kalbhorलोणी काळभोर