शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
3
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
5
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
6
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
7
अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय
8
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
9
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
10
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
11
शिराळ्यात नाईक विरुद्ध नाईक चुलत भावांमध्ये लढत! केदार नलवडे रिंगणात; तिरंगी सामन्यात कोण मारणार बाजी ?
12
'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज
13
नुसती ढकलाढकली, मेट्रो जोडणीमुळे घाटकोपर स्टेशन ठरले गर्दीचे 'हॉटस्पॉट'!
14
मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत
15
फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात
16
कमाल! नोकरीसोबतच घरची जबाबदारी, ६ वेळा नापास; २ मुलींची आई ४० व्या वर्षी झाली IAS
17
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
18
Delhi Blast: दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी किती पैसे दिले गेले होते, डॉ. शाहीनची काय होती भूमिका?
19
बँकिंग शेअर्समध्ये ऐतिहासिक तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ; 'ही' आहेत प्रमुख ४ कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत पालखी बंदोबस्तादरम्यान गावठी कट्ट्यासह २१ जिवंत काडतुसे जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 18:03 IST

 संत तुकाराम महाराजांच्या पालखी बंदोबस्तादरम्यान गावठी कट्ट्यासह २१ जिवंत काडतुसे जप्त केली...

ठळक मुद्देबारामती क्राईम ब्रँचची कारवाई 

बारामती: संत तुकाराम महाराजांच्या पालखी बंदोबस्तादरम्यान बारामती क्राईम ब्रँचने मोठी कारवाई करत एका गावठी कट्ट्यासह २१ जिवंत काडतुसे जप्त केली. एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी गणेश भीमराव पडळकर (रा. वायसेवाडी, अकोले, ता. इंदापूर, जि.पुणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे.  संत तुकाराम महाराज पालखी बंदोबस्ताच्या अनुषंगाने क्राईम ब्रँच बारामती येथे गुन्हेगार चेक आणि काँबिंग कारवाई करत असताना गोपनीय माहिती मिळाली. वायसेवाडी, अकोले (ता. इंदापूर)  येथे एका   व्यक्तीकडे बेकायदेशीररित्या गावठी कट्टा आणि कडतुसे बाळगून आहे. त्यावरून अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली छापा घातला असता आरोपी पडळकर याच्याकडे गावठी कट्टा, ६ मोठे, १५ लहान असे २१ जिवंत काडतुसे,  एस्ट्रा मॅगझीन असा एकूण २४ हजार रूपयांचा माल मिळून आला. सदर आरोपीने काही काडतुसे जवळपासच्या डोंगरात गावठी कट्ट्यासोबत वापरली आहेत, अजून काही काही हत्यारे कोणाला दिली अगर कसे याबाबत तपास सुरू आहे. या कारवाईमध्ये बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक, चंद्रशेखर यादव यांच्यासह स्वप्नील अहिवळे, दशरथ कोळेकर, रमेश केकान, सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, शर्मा पवार, स्वप्नील जावळे, रॉकीदेवकाते यांनी सहभाग घेतला.———————————

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा