शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

कुरिअरने घरी पाठवले दोनशे विद्यार्थ्यांचे दाखले : पालक हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 18:14 IST

अ‍ॅमेनोरा स्कूलने मागील शैक्षणिक वर्षात केलेल्या शुल्कवाढीला पालकांकडून सातत्याने विरोध करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअ‍ॅमेनोरा स्कूलविरोधात पालकांचे आंदोलन या शैक्षणिक वर्षाचे शुल्क ६५ हजार रूपयांवरून ८५ हजार अ‍ॅमेनोरा स्कूलच्या या शुल्कवाढी संदर्भात १५ दिवसांपूर्वी शिक्षणमंत्र्यांच्या दालनात बैठक विद्यार्थ्यांचे नुकसान होईल अशी कोणतीही कृती शाळेने करू नये असे स्पष्ट निर्देश

पुणे : हडपसर येथील अ‍ॅमेनोरा स्कूलने शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर दोनशे विद्यार्थ्यांचे दाखले कुरिअरने त्यांच्या घरी पाठविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याविरोधात पालकांनी गुरूवारी सकाळी शाळेसमोर आंदोलन केले. शाळेने याबाबत तोडगा न काढल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा पालकांकडून देण्यात आला आहे.अ‍ॅमेनोरा स्कूलने मागील शैक्षणिक वर्षात केलेल्या शुल्कवाढीला पालकांकडून सातत्याने विरोध करण्यात येत आहे. शाळेने २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाचे शुल्क ६५ हजार रूपयांवरून ८५ हजार इतके केले होते. शुल्कवाढ करताना नियमानुसार पालक शिक्षक संघाची मान्यता घेण्यात आली नाही. त्यामुळे ही शुल्कवाढ बेकायदेशीर असल्याने भरण्यास पालकांकडून नकार देण्यात आला होता. मात्र शाळा प्रशासन शुल्कवाढ करण्यावर ठाम होते.शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर अचानक अ‍ॅमेनोरा शाळा प्रशासनाने दोनशे पालकांच्या त्यांच्या पाल्यास शाळेतून काढून टाकल्याचे स्पष्ट करून त्यांचे दाखले घरपोच पाठवून दिले. यामुळे पालकांना मोठा धक्का बसला. गुरूवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांनी शाळेसमोर एकत्र येऊन या शुल्कवाढीचा तीव्र निषेध केला.शिवसेनेचे शहर समन्वयक आनंद दवे यांनी सांगितले, अ‍ॅमेनोरा शाळेने विद्यार्थ्यांचे दाखले कुरिअरने घरी पाठविल्याच्या प्रकरणाची शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी तातडीने शाळेविरूध्द कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. ही कारवाई न झाल्यास पालकांकडून आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.  अ‍ॅमेनोरा स्कूलच्या या शुल्कवाढी संदर्भात १५ दिवसांपूर्वी शिक्षणमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली होती. या बैठकीला शाळा व्यवस्थापन, पालक, मुख्याध्यापक, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येईल अशी कुठलीही कृती शाळा व्यवस्थापनाने करू नये अशा स्पष्ट सुचना त्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र तरीही त्याला न जुमानता शाळेने विद्यार्थ्यांचे दाखले घरपोच पाठविल्याने पालक संतप्त झाले आहेत.  ...............चौकशी करून योग्य ती कारवाई शिक्षणमंत्र्यांकडे अ‍ॅमेनोरा शाळेच्या शुल्कवाढी संदर्भात झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांचे नुकसान होईल अशी कोणतीही कृती शाळेने करू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र तरीही शाळेने विद्यार्थ्यांचे दाखले घरी पाठविल्याच्या तक्रारी पालकांकडून आल्या आहेत. याप्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल.- मिनांक्षी राऊत, शिक्षण उपसंचालक

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षण