शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

अल्पवयीन चोरट्यांकडून चोरीच्या वीस दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 13:04 IST

पोलिसांना या मुलांनी आणखी २० दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यानंतर शहराच्या विविध भागातून सर्व दुचाकी जप्त केल्या.

ठळक मुद्देविविध नऊ पोलीस ठाण्यांतील १६ गुन्हे उघडकीस

पिंपरी : दोन अल्पवयीन मुलांकडून चोरीच्या विविध कंपन्यांच्या २० दुचाकी जप्त करण्यात निगडी पोलिसांना यश आले. या कारवाईत विविध नऊ पोलीस ठाण्यांतील १६ गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडमधील थरमॅक्स चौकात दोन अल्पवयीन मुले दुचाकीसोबत उभे असल्याचे निगडी पोलिसांना समजले. त्यावरून पोलिसांनी मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे दुचाकीबाबत चौकशी करण्यात आली. त्यात ती दुचाकी चोरीची असून खोटी नंबरप्लेट लावल्याचे उघडकीस आले.याच तपासात पोलिसांना या मुलांनी आणखी २० दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यानंतर शहराच्या विविध भागातून सर्व दुचाकी जप्त केल्या. तसेच ताब्यात घेतलेल्या दोघांनी काही दुचाकी संजय लक्ष्मण गुदडावत (वय ३२, रा. भिवरेवाडी मरकळ, ता. हवेली, पुणे), शिवभगत राजकमल बिरावत (वय २८, रा. बजरंगवाडी, शिक्रापूर, पुणे), इक्बाल रामसिंह नाणावत (वय २६, रा. अष्टापूर फाटा, हवेली, पुणे) यांना विकल्या होत्या. चोरीची वाहने खरेदी केल्याप्रकरणी वरील तिघांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे निगडी पोलीस ठाण्यातील सहा गुन्हे, चाकण पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे, आळंदी पोलीस ठाण्यातील दोन, भोसरी एमआयडीसी, पिंपरी, डेक्कन, देहूरोड, लोणीकंद, यवत पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक  असे एकूण नऊ पोलीस ठाण्यांतील १६ गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विजय पळसुले, निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे, तात्या तापकीर, फारुख मुल्ला, नितीन बहिरट, मंगेश गायकवाड, नारायण जाधव, रमेश मावसकर, राम साबळे, जमीर तांबोळी, किशोर पढेर, विलास केकाण, मच्छिंद्र घनवट यांच्या पथकाने केली....................... 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnigdiनिगडीPoliceपोलिसCrimeगुन्हाtwo wheelerटू व्हीलर