शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बांबूपासून इथेनॉल निर्मितीच्या कामात २० कोटींची फसवणूक; कंपनीच्या ३ संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल

By प्रकाश गायकर | Updated: April 5, 2024 19:51 IST

कंत्राट देणाऱ्या कंपनीची २० कोटी ४४ लाख रुपयांची फसवणूक

पिंपरी : बांबूपासून इथोनॉल निर्मितीच्या कामाचे कंत्राट दिलेल्या कंपनीकडून कोट्यवधी रुपये घेऊन प्रत्यक्ष काम न करता रकमेचा अपहार करत २० कोटी ४४ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या तीन संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २१ सप्टेंबर २०१६ ते ४ एप्रिल २०२४ या कालावधीत रहाटणी आणि आसाम येथे घडला.

धवल डिस्टील इव्याप प्रा. लि. या कंपनीचे संचालक रवींद्र भास्कर जयवंत, संजीव रमेश राजे आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी टॉम्सा डिस्टील इंडिया प्रा. लि. कंपनीचे बिजनेस डेव्हलपमेंट संचालक संदीप अशोक बनसुडे (वय ३५, रा. भोसरी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, टॉम्सा डिस्टील इंडिया प्रा. लि या कंपनीला आसाम बायो रिफायनरी प्रा. लि. या कंपनीकडून बांबू पासून बायो इथेनॉल निर्मिती प्रकल्पातील फर्मेंटेशन आणि इव्हॅपोरेशन या दोन सेक्शन उभारणीचे कंत्राट मिळाले होते. धवल डिस्टील इव्याप प्रा. लि. या कंपनीचे संचालक संशयित आरोपींनी ते सब कंत्राट टॉम्सा कंपनीकडून घेतले.

त्यासाठी टॉम्सा कंपनीकडून धवल डिस्टील इव्याप कंपनीने २६ कोटी २८ लाख १३ हजार ६५२ रुपये घेतले. त्यातील ५ कोटी ८३ लाख ३१ हजार ९८२ रुपयांचे मटेरियल आणि प्रकल्प उभारणीचे कामकाज करण्यात आले. उर्वरित २० कोटी ४४ लाख ८१ हजार ६७० रुपये आरोपींनी कंपनीच्या आणि स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. खोट्या पर्चेस ऑर्डर दाखवून २० कोटी ४४ लाख ८१ हजार ६७० रुपयांची टॉम्सा डिस्टील इंडिया कंपनीची फसवणूक केली. याप्रकरणी टॉम्सा डिस्टील इंडिया कंपनीने पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेत तक्रार नोंदवली. आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून रवींद्र भास्कर जयवंत याला अटक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकMONEYपैसा