शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

वाळूमाफियांना भिगवण पोलिसांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 17:07 IST

२० जणांवर गुन्हा, १७ जणांना केली अटक

उजनी धरणातून  वाळु उपसा करणाऱ्या वाळु तस्करांना महसुलच्या पथकाने तसेच भीगवण पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. शनिवारी  खानवटे आणि डिकसळ परिसरात वाळू उपसा करणाऱ्या बोटी तर चार सक्शन बोटी अशा एक कोटींच्या बोटी जिलेटीनच्या साह्याने नष्ट करण्यात आल्या. या प्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून १७ जणांना अटक करण्यात आली आहे.  

सिपू नुरुलहक्क शेख (वय ३०), मोहम्मद नाईम जलालुद्दीन अख्तर (वय २३), जहीर शहाजहान शेख (वय ३०), साहिब पेशकर शेख (वय ३२), मोहम्मद अहमद हुसेन शेख (वय ३०), मुश्राफ कादर शेख (वय २९), इस्माईल इनसाराली शेख (वय ३६), अनसुर इनामुल शेख (वय २८) तसेच त्यांचे इतर १० साथीदार आणि ३ बोटी मालक वाळू माफिया यांच्या विरोधात गुन्ह्या दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. फरार तीन आरोपींचा शोध सुरु आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या पथकातील पोलीस हवालदार दतात्रय खुटाळे, इंन्क्लाब पठान, समीर करे, दतात्रय जाधव यांच्या पथकाने केली. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळू माफियांवर भिगवणपोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत १ कोटी रुपयाची चोरी करण्यास आवश्यक असणारी यंत्रणा नष्ट करण्यात आली.  उजनी धरणातील वाळू तस्करांवर अनेक वेळा कारवाई करूनही मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. येथील वाळू उपस्याबाबत अनेककांनी तक्रारी केल्या होत्या. खानवटे आणि डिकसळ परिसरात रात्री अंधाराचा फायदा घेत चार बोटी आणि चार सक्शन बोटींनी वाळूचा उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस अधिक्षक अभिनव  देशमुख यांनी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जीवन माने यांनी पोलीस पथकासह उजनी धरणातील वाळू चोरी करणाऱ्या फायबर आणि सेक्शन यांच्यावर कारवाई केली. डीकसळ येथील पुलावर रात्री अडीच वाजता पोलीस गेले. या ठिकाणी त्यांना वरील चार बोटी वाळू उपसा करतांना दिसल्या. पोलिसांनी बोटीच्या साह्याने धरणात जात या वाळु उपसा करणाऱ्या बोटी ताब्यात घेत १७ जणांना अटक केली. या वेळी तीन बोट मालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. खानवटे येथेही कारवाई करत तेथील बोटी डिकसळ येथे आणल्या. यानंतर सकाळी याची माहिती महसुल विभागाला देण्यात आले. सकाळी महसुल विभागाचे पथक डिकसळ येथे आले. यावेळी त्यांनी बोटींची पाहणी केली. जिलेटीनच्या साहाय्याने पोलिसांच्या उपस्थितीत या सर्व बोटी नष्ट करण्यात आल्या. 

वाळू तस्करांविरोधात कारावाईत सातत्य राखुन कठोर कारवाई केली जाणार आहे. काल केलेल्या कारवाईत १ कोटींच्या बोटी नष्ट करण्यात आल्या आहेत. 

जीवन माने, साहाय्यक पोलीस निरीक्षक, भिगवण पोलीस ठाणे

चौकट 

आतापर्यत वाळू माफियावर केलेल्या कारवाईत तस्करांचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. असे असले तरी वाळू माफियांवर गुन्हा दाखल करण्याचे प्रमाण अल्प होते. बोटी नष्ट केल्या तरी  झालेल्या नुकसानीचे दोन दिवसात पुन्हा दुरूस्ती करत वाळू माफिया पुन्हा सक्रीय होत आहे. मात्र, आता गुन्हे दाखल होत असल्याने खऱ्या अर्थाने वाळू माफियांचे कंबरडे मोडणार आहे.  

टॅग्स :PuneपुणेBhigwanभिगवणWaterपाणीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी