२ हजार रुपयांसाठी डोक्यात दगड घालून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 03:40 IST2018-10-30T03:40:06+5:302018-10-30T03:40:43+5:30

कामाचे २ हजार रुपये देण्यावरून झालेल्या वादात एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला

For 2 thousand rupees, you should have a stone on your head | २ हजार रुपयांसाठी डोक्यात दगड घालून खून

२ हजार रुपयांसाठी डोक्यात दगड घालून खून

पुणे : कामाचे २ हजार रुपये देण्यावरून झालेल्या वादात एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. हा प्रकार संगमवाडीकडून सादलबाबा चौकाकडे जाणाऱ्या रोडवर ओढ्याच्या पुलाजवळ सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्यापूर्वी घडला.
नरसिंगराम बुटाराम गर्ग (वय ३७, रा़ बुधवार पेठ, मूळ राजस्थान) असे त्याचे नाव आहे़ याप्रकरणी येरवडा पोलिसांनी दुर्गेशनाथ गोपीनाथ गोस्वामी (वय २९, रा़ लोहगाव) याला अटक केली आहे़

याबाबत पोलिसांनी सांगितले, की नरसिंगराम गर्ग आणि दुर्गेशनाथ गोस्वामी दोघेही सुतारकामाचा व्यवसाय करीत होते. गोस्वामी याच्याकडे गर्ग पूर्वी काम करीत होता़ त्या सुतार कामाचे २ हजार रुपये गोस्वामी याने गर्गला द्यायचे होते. पण तो पैसे देत नव्हता. रविवारी गर्ग याने त्याच्याकडे पुन्हा पैशाची मागणी केली. तेव्हा गोस्वामी मोटारसायकलवरून बुधवार पेठेत गर्गकडे आला़ यावेळी त्याने गर्ग याला १ हजार रुपये दिले. त्यानंतर दोघेही मोटारसायकलवरून लोहगावकडे जात होते़ सादलबाबा चौकाकडे जाणाºया रोडवर ओढ्यावरील पुलाजवळ ते लघुशंकेसाठी थांबले़ तेव्हा गोस्वामी याने गर्ग याला शिवीगाळ करून लाथ मारून त्याला खाली पाडले़ तेथे असलेल्या सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारून त्याचा खून केला़ त्यानंतर तो लोहगावला घरी आला.

संगमवाडी येथे एकाची हत्या झाल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली. पोलीस कर्मचारी प्रफुल्ल मोरे, प्रवीण भालचिम यांनी गोस्वामी याचे घर गाठले़ त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्यानेच गर्गचा खून केल्याची कबुली दिली़ गोस्वामीकडून पोलिसांनी गर्गचे पाकिट, मोबाइल जप्त केले़ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर अधिक तपास करीत आहेत़

Web Title: For 2 thousand rupees, you should have a stone on your head

टॅग्स :Murderखून